जनहितचे पाचव्या दिवशीही आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:24+5:302021-05-16T04:21:24+5:30
भीमा नगर : उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन ...
भीमा नगर : उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन पाचव्या दिवशी कायम राहिले. या आंदोलनाला पाचव्या दिवशी माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांचे चिरंजीव ॲड. बाळासाहेब पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर पाठिंबा दिला.
उजनी धरणाचे पाच टीएमसी.पाणी इंदापूरला नेण्याचा आदेश रद्द करावा,या मागणीसाठी शेतकरी नेते प्रभाकर देशमुख यांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे - पाटील, सचिव माऊली हळणवर, उपाध्यक्ष बापूसाहेब मेटकरी, सदस्य धनाजी गडदे, सहसचिव किरण भांगे, रुक्मिणीताई दोलतोडे, विठ्ठल मस्के यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला.
---
१५ उजनी स्ट्राईक
जनहित शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनात शासनाचा निषेध नोंदवताना संजय पाटील-भीमानगरकर, प्रभाकर देशमुख आणि आंदाेलनकर्ते