‘भागवत कथासार’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:57+5:302021-07-07T04:27:57+5:30

पंढरपूर : ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांच्या श्रीमद्भागवत कथासार या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन पद्मभूषण विजय भटकर यांच्या हस्ते ...

Publication of 'Bhagwat Kathasar' | ‘भागवत कथासार’चे प्रकाशन

‘भागवत कथासार’चे प्रकाशन

Next

पंढरपूर : ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांच्या श्रीमद्भागवत कथासार या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन पद्मभूषण विजय भटकर यांच्या हस्ते झाले. या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याला लेखक बाळासाहेब बडवे, एमआयटीचे संचालक प्रा. वि. दा. कराड, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. बाळासाहेब हरिदास, अपर्णाताई परांजपे, दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.

भागवतामधील धर्मशास्त्राच्या प्रचलित व्यवहारातील संदर्भ देऊन सामाजिकदृष्ट्या भागवत सादर करण्याचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने राष्ट्राभिमानी समाज घडविण्याचा प्रयत्न लेखक बडवे यांनी केला आहे, असे उद्गार श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले.

प्रा. वि. दा. कराड यांनी सांगितले की, विज्ञानाचा आविष्कार हा भागवतासारख्या धर्मग्रंथातून यापूर्वीच झाला आहे. परंतु त्याला समाजाशी जोडून घेण्याकरिता या धर्मशास्त्राची नवी परिभाषा मांडण्याची गरज आहे. प्रा. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले तर अनिरुद्ध बडवे यांनी आभार मानले.

------

०६ पंढरपूर

भागवत कथासागरचे प्रकाशन करताना पद्मभूषण विजय भटकर आणि बाळासाहेब बडवे.

Web Title: Publication of 'Bhagwat Kathasar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.