‘श्रावणमास : आध्यात्मिक महत्त्व’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:04+5:302021-08-12T04:26:04+5:30
अक्कलकोट : अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने ‘श्रावणमास : आध्यात्मिक महत्त्व’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दीर्घकाळ देशसेवा ...
अक्कलकोट : अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने ‘श्रावणमास : आध्यात्मिक महत्त्व’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दीर्घकाळ देशसेवा करून निवृत्त झालेले चोळय्या स्वामी व गुड्डापूर देवस्थानच्या चेअरमनपदी निवड झालेले सिद्धय्या स्वामी यांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ष.ब्र.जयगुरुशांतलिंगाराध्याय शिवाचार्य महास्वामी कुंभार मठ, म. नि. प्र. बसवलिंग महास्वामी विरक्त मठ, अक्कलकोट, ष. ब्र. गुरलिंग शिवाचार्य महास्वामी बंगरगा, ता, आळंद, म. नि. प्र. प्रभुशांत महास्वामी हत्तीकणबस यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सतीश स्वामी, इरय्या नंदिकोल यांनी वेदघोष केला. यावेळी गुड्डापूर देवस्थानचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी, उद्योगपती रेवणसिद्ध चडचणकर, हिंदू लिंगायत मंचाचे जिल्हाध्यक्ष गजानन धरणे, मुस्तारे, राहुल पावले, तीर्थचे बसवराज शास्त्री, काशीनाथ गुरव, प्रसाद हारकूड, सिद्धाराम टाके, मल्लिनाथ स्वामी, जंगम समाजाचे अध्यक्ष सिद्धाराम मठपती, धानय्या स्वामी, माळी समाज अध्यक्ष अप्पू पराणे, अभिजित लोके, महानंदा उडचण महिला मंडळ अध्यक्ष सावित्री गोरे, सुजाता स्वामी, मल्लिकार्जुन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अप्पू खेडगी उपस्थित होते.---------
फोटो : १० अक्कलकोट १
‘श्रावणमास : आध्यात्मिक महत्त्व’ पुस्तकाचे प्रकाशन करताना ष.ब्र.जयगुरुशांतलिंगाराध्याय शिवाचार्य महास्वामी, म. नि. प्र. बसवलिंग महास्वामी विरक्त मठ, ष. ब्र गुरलिंग शिवाचार्य महास्वामी, म. नि. प्र.प्रभुशांत महास्वामी.