सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:23 AM2018-01-06T09:23:33+5:302018-01-06T09:25:23+5:30

जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले.

Pulses of green paddy in Solapur district increased by two and a half times, as wheat area increased, area of ​​sorghum was reduced | सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

Next
ठळक मुद्देरब्बी हंगामातील पेरणीसाठी यावर्षी पावसामुळे उशीर झाला होतासोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा व त्यातही ज्वारीची पेरणी क्षेत्र सरासरी मोठ्या प्रमाणावर असतेयावर्षी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे


अरुण बारसकर  
सोलापूर दि ६ : जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले.
रब्बी हंगामातील पेरणीसाठी यावर्षी पावसामुळे उशीर झाला होता. परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने रब्बीची पेरणी दरवर्षीपेक्षा उशिराने सुरू झाली. याचा परिणाम ज्वारीचे क्षेत्र घटण्यामध्ये झाला. सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा व त्यातही ज्वारीची पेरणी क्षेत्र सरासरी मोठ्या प्रमाणावर असते; मात्र यावर्षी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. यावर्षी पावसाला जून महिन्यातच सुरुवात झाली. यामुळे खरिपातील पिकांचे क्षेत्रही सरासरीपेक्षा वाढले होते. मधल्या कालावधीत खंडित झालेला पाऊस आॅगस्टनंतर सक्रिय झाल्याने ऊस लागवडीवर शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले. पाऊस चांगला पडल्याने व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उसाचे क्षेत्र अनायसा वाढले आहे. त्यातच परतीचा पाऊस आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्याने रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाला. जिल्ह्याचे ज्वारी पेरणीचे सरासरी क्षेत्र ५ लाख ५६ हजार ८०० हेक्टर होते. प्रत्यक्षात तीन लाख १२ हजार ५०० हेक्टरच्या जवळपास ज्वारीची पेरणी झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी सांगते. उशिरा वाफसा झालेल्या जमिनीवर शेतकºयांनी मका पीक घेण्याला प्राधान्य दिले. यामुळे सरासरीच्या दीडपट क्षेत्रावर मका पीक घेतले. 
उशिराने हरभरा व गव्हाची पेरणी केली जाते. ज्वारी व अन्य पिके न घेतलेल्या शिल्लक क्षेत्रावर शेतकºयांनी गहू व हरभºयाची पेरणी केली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ५५ हजार ३०० हेक्टरवर तर हरभºयाचे सरासरी क्षेत्र ३६ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ७८ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू सरासरीच्या दीडपट तर हरभरा सरासरीच्या अडीचपट पेरणी झाली आहे. 
------------------
मागील वर्षीपेक्षाही अधिक हरभरा 
च्मागील वर्षी सरासरीच्या दीडपट हरभºयाची पेरणी झाली होती. यावर्षी सरासरीच्या अडीचपट पेक्षाही अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यावर्षी हरभºयाचे अधिक उत्पादन झाले तर दराची मोठी घसरण होईल अशी भीती कृषी अधिकारी व शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने हरभºयाचे दर घसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. 
-------------------------
आता ऊस अन् कांदा सगळीकडे..
च्यावर्षी पाऊस चांगला पडल्याने व अन्य पिकांतून पैसे मिळत नसल्याने शेतकºयांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लावला आहे. सुधारित जातीच्या बेण्याचा वापर  केला आहे. याशिवाय कांद्याला चांगला भाव असल्याने जमेल त्या ठिकाणी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे ऊस व कांदा सगळीकडेच दिसत आहे. 
-----------------
हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. पीकही चांगले आहे. अधिक उत्पादन होईल असे वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे. जवळपास सर्वच पिकांचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: Pulses of green paddy in Solapur district increased by two and a half times, as wheat area increased, area of ​​sorghum was reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.