आषाढीसाठी पुणे - मिरज- पुणे विशेष डेमू ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळ अन् थांबे 

By Appasaheb.patil | Published: July 12, 2024 04:39 PM2024-07-12T16:39:14+5:302024-07-12T16:39:54+5:30

या निर्णयामुळे राज्यभरातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. आषाढीसाठी रेल्वेने जास्तीच्या ज्यादा गाड्या सोडल्या आहेत.

Pune - Miraj - Pune special demo train will run for Ashadhi; Know the time and wait  | आषाढीसाठी पुणे - मिरज- पुणे विशेष डेमू ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळ अन् थांबे 

आषाढीसाठी पुणे - मिरज- पुणे विशेष डेमू ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळ अन् थांबे 

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला होणाऱ्या अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे - मिरज- पुणे आषाढी विशेष डेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. आषाढीसाठी रेल्वेने जास्तीच्या ज्यादा गाड्या सोडल्या आहेत.

दरम्यान, पुणे - मिरज- पुणे आषाढी विशेष डेमू ट्रेन एकूण १२ फेऱ्या करणार आहे. १५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत ही ट्रेन दररोज पुणे रेल्वे स्थानकाहून सकाळी ८:३० वा निघणार आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:१५ वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. त्यानंतर मिरज-पुणे विशेष डेमू ट्रेन ही मिरज रेल्वे स्थानकाहून सायंकाळी ४:४५ वाजता निघणार आणि त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. या गाडीला हडपसर, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमंकाळ, सलगरे, अरग आणि मिरज असणार आहेत. ही गाडी दहा डब्याची असणार आहे. तरी आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांनी वरील विशेष डेमू ट्रेनचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आषाढीसाठी रेल्वे प्रशासनाने ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. याशिवाय वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे.

Web Title: Pune - Miraj - Pune special demo train will run for Ashadhi; Know the time and wait 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.