धान्यवाटप करण्याचे पुण्याचे काम तुमच्या हाती, याचं भान ठेवा : कुुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:15 AM2021-06-23T04:15:48+5:302021-06-23T04:15:48+5:30
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मोहोळ ...
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मोहोळ येथील शासकीय गोडाऊन परिसरामध्ये त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. ही लागवड करीत असतानाच कुलकर्णी यांनी या झाडांची जबाबदारी गोडावूनमध्ये काम करणारे व रेशन दुकानदारांना सोपविली.
यावेळी कुलकर्णी यांनी शासकीय धान्य गोदामाची पाहणी करीत उपलब्ध असलेला गहू व तांदूळ यांची पाहणी करून योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या वेळी तहसीलदार जीवन बनसोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, पुणे विभागाचे विभागीय गोदाम निरीक्षक एस.एम. सरडे, नायब तहसीलदार लीना खरात, तालुका पुरवठा अधिकारी शैलजा बिजरर्गी, पुरवठा निरीक्षक संदीप गायकवाड, गोडावून अधीक्षक सुजाता सांगळे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अमोल शिंदे, नागेश माळी आदी उपस्थित होते.
----
रेशन कार्डबाबत ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याचा निपटारा करण्यासाठी महिन्यातून एकदा पुरवठा कार्यालयामध्ये कॅम्पचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कुलकर्णी यांनी दिल्या.
----
फोटो : २२ मोहोळ
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करताना.