बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब बँकेला ६ कोटींचा गंडा

By Admin | Published: October 22, 2016 04:30 PM2016-10-22T16:30:01+5:302016-10-22T16:30:01+5:30

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन खरेदी केल्याचे दाखवून व खरेदी केलेल्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून पंजाब नॅशनल बँकेची ६ कोटींची फसवणूक करण्यात आली.

Punjab Bank gets 6 crores on fake documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब बँकेला ६ कोटींचा गंडा

बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब बँकेला ६ कोटींचा गंडा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २२ -   बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन खरेदी केल्याचे दाखवून व खरेदी केलेल्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून पंजाब नॅशनल बँकेच्या दयानंद कॉलेज शाखेची ६ कोटी ३७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन एजंटासह सोलापुरातील ७५ जणांविरुद्ध जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश शर्मा (रा. एच ९, विद्याविहार, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७५ जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा हे २६ मे २०१५ ते २० जुलै २०१६ या कालावधीत या शाखेत व्यवस्थापक म्हणून वेमुरी रमेश कुमार हे कार्यरत होते. त्यांच्या कालावधीत १२० जणांना वाहन कर्जाचे वाटप झाले. 
त्यातील ७२ जणांनी सोलापूर व्हील्स, नॅशनल मोटर्सचे सबडीलर इम्तियाज आरिफ फैय्याज व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नीलेश निवृत्ती जिंबळ, युनिक मोटर्सचे सबडीलर अहमद मुस्तफा हुसेन सगरी यांच्याशी संगनमत करून वाहन कर्जासाठी लागणारे खरेदीपत्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नोंदणीपत्र, तसेच वाहनाची बनावट विमा पॉलिसी बँकेला सादर करून कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर यातील काही जणांनी खरेदी केलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केली. त्यात या आरोपींनी संगनमत करून बँकेचा कर्ज फेडल्याचा बनावट दाखला आरटीओ कार्यालयास सादर करून वाहन परस्पर दुसºयाच्या नावे केले. तसेच काही जणांनी वाहन न घेताच कर्जाची रक्कम उचलून बँकेची फसवणूक केली. कर्जदारांकडून हप्ते न भरले गेल्याने बँकेने वाहनांची चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे. आरटीओ कार्यालयात खातरजमा करून याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. 
 
तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
पोलिसांनी चौकशी करून संबंधितांविरुद्ध जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी या गुन्ह्याची व्याप्ती पाहता हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची सूचना केली. गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. बँकेला गंडविणाºया एजंटाची साखळी असून, चौकशीत आणखी काही नावे बाहेर येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. यातील काही जणांनी बँकेतून कर्जाऊ वाहने घेतली व नंतर बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकली तर काही जणांनी वाहन न घेताच कर्ज उचलले आहे.

Web Title: Punjab Bank gets 6 crores on fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.