'कोरोना'सह इतर विषाणूंवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:32 AM2020-05-03T11:32:24+5:302020-05-03T11:36:13+5:30
सोलापूर विद्यापीठातील प्रयोगशाळेसाठी सिव्हील हॉस्पीटलचेही सहकार्य : पहिल्या टप्प्यात १० लाखांचा निधी
सोलापूर : जगभरातील शास्त्रज्ञ हे कोरोना विषाणूवर संशोधन करत असताना सोलापुरातही अशा प्रकारचे संशोधन होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कोरोनासह इतर विषाणूवर संशोधन करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सीलने हा प्रस्तावास मान्यता दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात लाईफ सायन्स संकुल सुरु करण्यात येणार आहे. या संकुलात एमएस्ससी मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून या अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.
सध्या कोरोना विषाणू जगभर पसरला असून आता तसेच भविष्यात अशा विषाणूवर संशोधन करण्याची जास्त गर आहे. हे ओळखून मॅननेजमेंट कौन्सीलच्या बैठकित या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. ही बैठस एप्रिल महिण्यात आॅनलाईन पद्धतीने झाली होती. या बैठकीत १० लाखांच्या पहिल्या टप्प्यातील निधीस मान्यता देण्यात आली.
येत्या काळात इतर मंडळाची मान्याता घेऊन शासनाकडे या अभ्यासक्रमासाठी परवानगी घेण्यात येणार आहे. विषाणू तसेच इतर संशोधनासाठी एक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. ही मायक्रोबायॉलॉजी प्रयोगशाळा कशी असावी याच्या पाहणीसाठी विद्यापीठातील तज्ञांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हील), डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेस भेट दिली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्राध्यापक यांच्या भरतीसाठी जाहीरात देण्यात येणार आहे.
------------------------------------–
पुण्या-मुंबईतील तज्ञांची मदत
विद्यापीठात प्रयोगशाळा उभी करण्यासाठी पुणे-मुंबई येथील तज्ञांशी सध्या चर्चा सुरु आहे. तसेच पुणे येथे असणाºया नॅशनल इन्स्टीट्युट आॅफ वायरॉलॉजी (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) यांचीही मदत घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्याने प्रयोगशाळा उभी करत त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. यासोबतच प्रयोगशाळा उभारणीसाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व कुुंभारी येथील अश्विनी वैद्यकिय महाविद्यालय हे सहकार्य करत आहेत.
------------------------------------
भविष्यात मायक्रोबायोलॉजी या विषयात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या दृृष्टीकोनातून या शैक्षणिक वर्षात मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रम सुरु करत आहोत. प्रयोगशाळा उभारणीसाठी विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. ज्या तज्ञांनी यापुर्वी प्रयोगशाळा उभारली त्यांची मदत घेण्यात येत आहे. विद्यापीठात सुरु होणाºया प्रयोगशाळेसाठी शासनाची मान्यता घेण्याची प्रकि या सुरु करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून दर्जेदार संशोधन होईल.
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
-------