सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू, आतापर्यंत १२४१ क्विंटल उडिदाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:59 PM2017-11-07T12:59:59+5:302017-11-07T13:02:34+5:30
जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटल उडिदाची विक्री झाली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटल उडिदाची विक्री झाली आहे. पाच केंद्रांवर ३५७१ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी खरिपातील सोयाबिन, मूग, उडिदाची हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे बंधनकारक केले आहे़ सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी, बार्शी, सोलापूर, दुधनी व अक्कलकोट येथे हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रावर उडीद, सोयाबिन व मुगाची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केल्यानंतर कुर्डूवाडी केंद्रावर सर्वाधिक दोन हजार १९ शेतकºयांनी नोंदणी केली.
सोलापूर केंद्रावर १४६, अक्कलकोट १२१, दुधनी ६१ तर बार्शी केंद्रावर १२२४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. बार्शी केंद्रावर नोंदणी केलेल्यांमध्ये १५० शेतकºयांनी सोयाबिनची नोंद केली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी केवळ कुर्डूवाडी केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटलची विक्री झाली आहे. अन्य हमीभाव केंद्रांपैकी बार्शी व दुधनी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धान्याची विक्री झालेली नाही. दुधनी केंद्रावर धान्य आणण्यासाठी शेतकºयांना मोबाईलवर एसएमएस पाठविला असला तरी शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
------------------------
११ ठिकाणी मका खरेदी केंद्रे
च्जिल्ह्यात करमाळा, बार्शी, अक्कलकोट, कुर्डूवाडी, अनगर, पंढरपूर, नातेपुते, अकलूज, सांगोला, मंगळवेढा व सोलापूर या ठिकाणी मका हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. मंजुरी मिळताच मागणीप्रमाणे हमीभावाने मका खरेदीला सुरुवात होईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.