लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:26 AM2018-06-23T11:26:24+5:302018-06-23T11:28:12+5:30

The purification of democracy started: Pasha Patel | लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल

लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल

googlenewsNext
ठळक मुद्दे देशात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्र्याने चमत्कार केला - पाशा पटेलमार्केट कमिटीमध्ये बोक्यांचं मतदान बंद झालंय - पाशा पटेल

सोलापूर : मी मुसलमान. माझा आजा शेतकरी, माझा बाप शेतकरी. मीपण शेतकºयांसाठी काम करतोय. ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते. तुम्हीही बाजार समितीच्या निवडणुकीत जातपात न बघता मतदान करा, असे आवाहन कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्री सिध्दरामेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पाशा पटेल यांनी आपल्या खुमासदार शैैलीत बाजार समिती निवडणूक आणि पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून शेतकºयांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. पाशा पटेल म्हणाले, पूर्वी सोसायटीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार होता.

आता तुमचं प्रमोशन झालंय. सुभाषबापूंनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. देशात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्र्याने चमत्कार केला. या मार्केट कमिटीमध्ये बोक्यांचं मतदान बंद झालंय. आता जो घाम गाळतोय, ज्याचा माल विकतोय, त्या विकणाºयाला पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय. लोकशाहीचे शुध्दीकरण सुरु झाले आहे. आता बोके गरिबांची जिरवतेत की गरीब बोक्यांची जिरवतेत हे या निवडणुकीतून लक्षात येणार आहे. आता बापूंनी सरळ रेघ आखून टाकली आहे. या रेघवर आता मतदान आहे. या माणसाने भल्याभल्याची जिरवली आहे. आता तुम्ही ठरवायचे आहे की तुम्ही माणसाला विजयी करायचं, की दुसºयाला. 

Web Title: The purification of democracy started: Pasha Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.