पिंपरकर कुटुंबावर कोरोनाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:15 AM2021-06-18T04:15:58+5:302021-06-18T04:15:58+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जांबूवंत यांची सुरवड (ता. इंदापूर) येथील बहीण सुवर्णा बनसुडे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जांबूवंत यांची सुरवड (ता. इंदापूर) येथील बहीण सुवर्णा बनसुडे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा ६ मे रोजी मृत्यू झाला. बहीण रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी जाण्या-येण्यात जांबूवंत पिंपरकर कोरोना बाधित झाले. त्यांना १० मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. एक एक करत घरातील सर्व कुटुंब कोरोना बाधित झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जांबूवंत यांच्या पत्नी आणि मुलांनी कोरोनावर मात केली. या कालावधीतच जांबूवंत यांचे चुलते पोपट पिंपरकर यांचे ३१ मे रोजी कोरोनाने निधन झाले.
त्यानंतर त्यांची आई चिंगाबाई पिंपरकर यांचा ९ जून रोजी कोरोनाने मृत्यू झाला. तर पाचव्या दिवशी जांबूवंतचे वडील बजरंग पिंपरकर यांच्यावर कोरोनाचा आघात झाला आणि वडिलांच्या तिसऱ्या दिवशी जांबूवंत (वय ३९) यांच्यावर कोरोनाने घाला घातला आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.