न्यूनगंड बाजूला ठेवून उद्योगांकडे वळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:06+5:302021-09-08T04:28:06+5:30
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शक व स्टेटा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित उद्योजकता विकास या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत ...
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शक व स्टेटा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित उद्योजकता विकास या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी कोकरे म्हणाले, नकारात्मक मानसिकतेमुळे मराठी माणूस उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहिला आहे. सकारात्मक विचार करून नवनवीन उद्योगधंदे सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राचार्य रणजित देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर केवळ नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय सुरू केले पाहिजेत. त्यात जिद्दीने यश मिळविले पाहिजे, असे आवाहन केले. संस्था अध्यक्ष बी. आर. गायकवाड, विश्वस्त एम. आर. गायकवाड व सचिव ए .आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेबिनार घेण्यात आले. यावेळी उपप्राचार्य व्ही. एम. गायकवाड, माधुरी गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. डी. बावचे यांनी केले तर आभार एस. एम. सावंत यांनी मानले.