शेकाप ३४, शिवसेना-राष्ट्रवादी १५, सर्वपक्षीय आघाडीकडे ९ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:21+5:302021-01-19T04:24:21+5:30

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ११ जागा ...

PWD 34, Shiv Sena-NCP 15, 9 gram panchayats in all party alliance | शेकाप ३४, शिवसेना-राष्ट्रवादी १५, सर्वपक्षीय आघाडीकडे ९ ग्रामपंचायती

शेकाप ३४, शिवसेना-राष्ट्रवादी १५, सर्वपक्षीय आघाडीकडे ९ ग्रामपंचायती

Next

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. तर प्रतिस्पर्धी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचबरोबर भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या नेतृत्वाखाली वासुद ग्रामपंचायतीवर ११ पैकी ६ जागा जिंकून शेकापकडून हस्तगत केली आहे.

सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या ५३९ जागेसाठी निवडणुकीची मतमोजणी सोमवारी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभाग्रहात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत सावर्डे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २५ टेबलवर ११ फेऱ्याद्वारे पार पडली.

मतमोजणीनंतर मानेगाव, आगलावेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, बुरंगेवाडी, किडेबिसरी, राजुरी, हटकर मंगेवाडी, यलमार मंगेवाडी, वाकी शिवणे, धायटी, लोटेवाडी, जुजारपूर, हणमंतगाव, नाझरे, महिम, मांजरी, शिरभावी, जुनोनी, वाणीचिंचाळे, घेरडी, महूद, डोंगरगाव, नराळे, खिलारवाडी, कटफळ, कमलापूर, उदनवाडी, देवळे, निजामपूर, गौडवाडी, सोमेवाडी या ग्रामपंचायतीवर शेकापने वर्चस्व मिळवले आहे. तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या महाविकास आघाडीला डिकसळ, हलदहिवडी, अचकदाणी, लक्ष्मीनगर एखतपूर, जवळा, पाचेगाव बु., हातीद, वझरे, मेडशिंगी, संगेवाडी, वाकी-घेरडी, आलेगाव, हंगिरगे, पारे या ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेकाप यांच्या सर्वपक्षीय आघाडीला अजनाळे, बामणी, कोळा, कडलास त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शेकाप आघाडीला अकोला व इटकी ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. मतमोजणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

फोटो ओळ ::::::::::::::::::::::

सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर कार्यकर्ते गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला.

Web Title: PWD 34, Shiv Sena-NCP 15, 9 gram panchayats in all party alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.