सात ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:30+5:302021-07-04T04:16:30+5:30

गेल्या चार महिन्यापासून सांगोला तालुक्यातील निजामपूर, खिलारवाडी, हणमंतगाव, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरुंगेवाडी, भोपसेवाडी या सात ग्रामपंचायतीच्या फेर आरक्षण सोडतीकडे ...

PWD dominates over seven gram panchayats | सात ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व

सात ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व

Next

गेल्या चार महिन्यापासून सांगोला तालुक्यातील निजामपूर, खिलारवाडी, हणमंतगाव, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरुंगेवाडी, भोपसेवाडी या सात ग्रामपंचायतीच्या फेर आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसीलदार अभिजित पाटील यांनी २९ जून रोजी सरपंचपदाच्या निवडीसाठी नव्याने फेर आरक्षण सोडत काढली होती. त्या फेर आरक्षण सोडतीनुसार ३ जुलै रोजी एकाच दिवशी या सात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड घेण्यात आली.

सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी डी. एस. इंगोले, एस. के. खंडागळे, डी. के. गावंदरे, आर. टी. ननवरे, बी. एन. कदम, डी. व्ही. भंडगे, व्ही. आर. उगले यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक यांनी काम पाहिले. सातही ग्रामपंचायतीवर शेकापने वर्चस्व राखल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

सरपंच निवड झालेली गावे आणि सरपंच

सांगोला तालुक्यातील निजामपूर (कमल नानासो कोळेकर), खिलारवाडी (शांताबाई शरद हिप्परकर), हणमंत गाव (दीपाली तात्यासाहेब खांडेकर), तरंगेवाडी (जयश्री शरद खताळ), आगलावेवाडी (शांता हरिचंद्र हाके), बुरुंगेवाडी (राजाक्का अर्जुन बुरुंगे), भोपसेवाडी (सखुबाई सुनील नरळे) या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे.

Web Title: PWD dominates over seven gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.