सव्वा महिन्यात आढळले सव्वाशे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:26 AM2021-09-12T04:26:56+5:302021-09-12T04:26:56+5:30
तालुक्यात आतापर्यंत ९,५९१ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात ऑगस्टपासून तब्बल २१५ रुग्ण आढळले. सध्या गौरी-गणपती उत्सव असल्याने बाजारपेठेत ...
तालुक्यात आतापर्यंत ९,५९१ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात ऑगस्टपासून तब्बल २१५ रुग्ण आढळले. सध्या गौरी-गणपती उत्सव असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी आहे. मात्र, येथे कोरोना नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक लोक मास्कविना मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे. दुकानासमोर खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचा फज्जा उडत आहे.
----
खबरदारी घ्या!
गर्दी वाढून कोरोनाला आमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनास पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक घडी कोलमडली जाते. यासाठी शहर व ग्रामीण भागातील व्यापारी, व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर गर्दी होऊन कोरोनाला आमंत्रण मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
----