दहिगाव उपसा सिंचनचे रबी आवर्तन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:20 AM2021-01-21T04:20:39+5:302021-01-21T04:20:39+5:30

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे ५१ लाख ३२ हजार वीजबिल आज कृष्णा ...

Rabi cycle of Dahigaon Upsa Irrigation will be available | दहिगाव उपसा सिंचनचे रबी आवर्तन मिळणार

दहिगाव उपसा सिंचनचे रबी आवर्तन मिळणार

Next

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे ५१ लाख ३२ हजार वीजबिल आज कृष्णा खोरे महामंडळातर्फे भरण्यात आल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे रबी आवर्तन तात्काळ सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही आ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाकडून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे १ कोटी २३ लाख वीज बिल जमा केलेले आहे. २०२० मधील उन्हाळी आवर्तनाचे वीजबिल ५१ लाख ३२ हजार नुकतेच जमा केल्यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

----

कोट १४ ऑक्टोबर २०२० रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहिगावच्या मुख्य कॅनॉलचे नुकसान झाले होते. कॅनॉल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, आवर्तन सुरू करण्यासाठी सध्या कोणताही अडथळा नाही. तसेच टप्पा दोन कुंभेज पंपगृह येथील चौथा पंप दुरुस्त केल्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना प्रथमच १०० टक्के क्षमतेने चालेल.

-

सी. ए .पाटील,उपअभियंता कुकडी डावा कालवा.

----

Web Title: Rabi cycle of Dahigaon Upsa Irrigation will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.