करमाळ्यातील बनावट खतविक्री करणाºया कंपनीचे रॅकेट उध्दवस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:04 PM2020-06-06T15:04:05+5:302020-06-06T15:05:33+5:30
माढा, कागल, करमाळा तालुक्यातील खतविक्रेत्यांविरूध्द गुन्हा दाखल
करमाळा : झुआरी अँग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीने जय किसान म्युरेट आँफ पोटॅश या खताचे बनावट करून माढा व करमाळा तालुक्यात विक्री केल्याप्रकरणी माढा, कागल व करमाळा तालुक्यातील खत विक्रेत्यांविरूध्द करमाळा पोलिस ठाण्यात कलम गुन्हा दाखल झाला आहे.
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील खत दुकानदार निलेश नंदकुमार खानोरे यांच्या सहयोग कृषी केंद्रामधुन गोयेगाव (ता.करमाळा) येथील शेतकरी अर्जुन राजाराम गावडे यांनी झुआरी कंपनीच्या जयकिसान पोटँशच्या ६ गोण्या प्रति गोणी ८५० रुपयाप्रमाणे घेतली होती. झुआरी कंपनीचे पोटॅश खत बनावट (बोगस) असल्याची तक्रार जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती.
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे खत नियंत्रक व जिल्हा गुणनियंत्रक सागर बारवकर यांनी करमाळयाचे तालुका कृषी अधिकारी एस.एस.पाटील, कृषीसहाय्यक उमाकांजाधव यांना बरोबर घेऊन वाशिंबे (ता.करमाळा) येथील सहयोग कृषी केंद्राची तपासणी शुक्रवारी दुपारी अचानक केली असता झुआरी कंपनीच्या बनावट पोटॅश खताची विक्री केल्याचे उघडकीस आले. सदर बनावट खते मोहन सुतार (रा.भांगे ता.कागल जि.कोल्हापूर) येथून अक्षय काशीद (रा.कन्हेरगाव ता.माढा जि.सोलापूर) यांना व तेथून (वाशिंबे ता.करमाळा) येथील मिलींद खानोरे या खत दुकानदाराकडे विक्रीसाठी आलेली होती.
याप्रकरणी जिल्हा कृषी कार्यालयाचे गुणनियंत्रन निरीक्षक सागर बारवकर यांनी तिघांविरोधात बनावट खत विक्री करुन शेतक-यांची फसवणुक केल्याची फिर्याद दिली आहे. करमाळा पोलिसात झुआरी कंपनीचे जयकिसान पोटॅश बनावट खत शेतक-यास विक्री करून फसवणुक केल्याप्रकरणी मोहन सुतार (रा.भांगे ता.कागल जि.कोल्हापूर) अक्षय काशीद (रा.कन्हेरगाव ता.माढा जि.सोलापूर) व निलेश खानोरे (रा.वाशिंबे ता करमाळा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.