शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:45 PM2019-08-21T13:45:00+5:302019-08-21T13:48:10+5:30

आमदार भारत भालके याच्यावर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा

Raghunath Patil to raise voice against bogus borrowers in the name of farmers | शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील

शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील

Next
ठळक मुद्दे- शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील पंढरपूर दौºयावर- आमदार भारत भालके याच्यावर कारवाई करण्याची केली मागणी- अन्यथा आंदोलन करण्याचा पाटील यांनी दिला इशारा

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष भारत भालके यांनी सभासदांच्या नावावर बोगस कर्ज घेतले. असेल तर त्यांच्यावर विरोधात आवाज उठवणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बाळासाहेब वाळके, रामभाऊ सारोळे, हनुमंत चौगुले, बाळासाहेब यादव, ज्ञानेश्वर बाबर, सुभाष चौगुले आदीजण उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, शेतकºयांना कर्जमाफी मिळते. हे कारखान्याच्या चेअरमनला माहिती आहे. त्यामुळे ते शेतकºयांच्या नावावर कर्ज काढतात. शेतकºयांना कर्जमाफी होण्याची वाट पाहतात. कर्जमाफीनंतर सर्व पैसे खिशात घालण्याचे काम करतात. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत भालके यांच्याविरोधात तक्रार केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.

शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज उचलणाºया कारखानदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी योग्यच आहे. आम्ही त्याबाबत आवाज उठवणार आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत भालके यांच्यावर कारवाई करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

Web Title: Raghunath Patil to raise voice against bogus borrowers in the name of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.