राहुल गांधी झोपडपट्टीत दोन गटात
By Admin | Published: June 11, 2014 12:34 AM2014-06-11T00:34:23+5:302014-06-11T00:34:23+5:30
दोन्ही गटातील पाच जणांवर गुन्हा हाणामारी
सोलापूर : किरकोळ कारणावरून राहुल गांधी झोपडपट्टीतील घिसाड गल्लीत दोन गटात हाणामारी झाली. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दोन्ही गटातील पाच जणांविरुद्ध जेलरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मकसूद महमद शेख (रा. कुर्बान हुसेन झोपडपट्टी, सोलापूर) त्याचा मुलगा सोहेल, युन्नूस कुरेशी आणि फय्याज अबुबकर हे तिघे लोखंडी पट्टी घेऊन भगवान राजाराम चव्हाण याच्याकडे आले. भगवानने त्याची मजुरी ८०० रुपये सांगितली. इतकी मजुरी होत नसल्याचे सांगताच भगवानने मकसूद याच्या पायाच्या नडगीवर चोप दिला तर अन्य दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. मकसूद याने दिलेल्या फिर्यादीनुसार भगवान याच्यासह दत्ता राजाराम चव्हाण आणि सतीश उत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
भगवान चव्हाण यानेही परस्परविरोधी फिर्याद नोंदवली आहे. कुळवाचा लोखंडी फास बनवण्यासाठी ७०० रुपये मजुरी सांगितली असता आरोपींनी भगवान चव्हाण यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.
भगवान याच्या फिर्यादीनुसार मकसूद महमद शेख (रा. कुर्बान हुसेन झोपडपट्टी, सोलापूर) सोहेल, युन्नूस कुरेशी, फय्याज अबुबकर कुरेशी (रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे सपोनि माळी करीत आहेत.