भोईंजेत भेसळयुक्त दुधावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:10+5:302021-04-12T04:20:10+5:30
बार्शी : भोइंजे येथे भेसळयुक्त दूध तयार करणा-या डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून दूध नष्ट केले. ...
बार्शी : भोइंजे येथे भेसळयुक्त दूध तयार करणा-या डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड
टाकून दूध नष्ट केले. तसचे लाख रुपयांचे साहित्य जप्त
करुन संबंधितावर गुन्हा दाखल केला.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने भोइंजेत ज्ञानेश्वर दत्तात्रय करळे यांच्या अक्षय डेअरीवर धाड टाकून कारवाई केली आहे. व्हे परमिट, खाद्यतेल वापरुन दुधामध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. कारवाईतील भेसळयुक्त दूध नाल्यात ओतून देऊन जवळपास लाख रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. य पथकाने भेसळयुक्त दुध या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेतला आहे.
या कारवाईत आयुक्त अभिमन्यू काळे, पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
----
११ मिल्क
भोईंजेत एका डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दूध नष्ट केले.