कुंटणखाना चालवल्याप्रकरणी अकलूच्या लॉजवर धाड; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:41+5:302021-03-06T04:21:41+5:30
अकलूज : असहाय्य पीडित महिलेला आश्रय देवून कुंटनखाना चालविला जात असलेल्या एका लॉजवर अकलूज पोलिसांनी धाड टाकून तिघांविरुद्ध ...
अकलूज : असहाय्य पीडित महिलेला आश्रय देवून कुंटनखाना चालविला जात असलेल्या एका लॉजवर अकलूज पोलिसांनी धाड टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लाॅजचा व्यवस्थापक प्रथमेश जयकुमार गायकवाड, मालक सिकंदर सलीम शेख व एजंट केशव जगन्नाथ हजारे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अकलूज येथील एका लाॅजचा व्यवस्थापक, मालक आणि एजंट यांनी असहाय्य पिडीत महिलेला लाॅजवर आश्रय दिला. तिच्या माध्यमातून कुंटनखाना चालविला जात असताना पोलिसांनी धाड टाकली. पोलीसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. पोलीस हवालदार विक्रम भारत घाडगे यांनी तिघाविरुध्द अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर करीत आहेत.