सोलापूर, पंढरपुरात आयकर विभागाच्या धाडी; चौकशी, कागदपत्रांची पडताळणी सुरू
By Appasaheb.patil | Published: August 25, 2022 01:17 PM2022-08-25T13:17:20+5:302022-08-25T13:18:06+5:30
Solapur : सोलापूर शहरातील एका खासगी रूग्णालयात व रूग्णालयातील डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
सोलापूर : सोलापूर शहरासोबतच पंढरपूर शहरात आयकर विभागाने गुरूवारी सकाळपासून धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे. धाडीनंतर आयकर विभागाचे अधिकारी हे कागदपत्रांची पडताळणी करून अधिक चौकशी करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सोलापूर शहरातील एका खासगी रूग्णालयात व रूग्णालयातील डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यात हदयरोग तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पंढरपूर शहरात एका साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरावर व कार्यालयावर आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. ते अधिकारी अधिक चौकशी करून संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या पाच तासांपासून दोन्ही ठिकाणी चौकशीचे सत्र सुरू आहे. या कारवाईने वैद्यकीय व साखर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद येथील एका साखर कारखान्यावरही आयकर विभागाने धाड टाकल्याचे सांगितले जात आहे.