बार्शी अन्‌ जामगावच्या लॉजवर छापा, कुंटणखान्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:47+5:302021-03-07T04:20:47+5:30

याबाबत सपोनि. शामराव गव्हाणे यांनी फिर्याद दिली असता लॉज व्यवस्थापक संजय ज्ञानोबा टाळके (वय ३९, रा. ...

Raid on the lodge of Barshi and Jamgaon, exposure of Kuntankhana | बार्शी अन्‌ जामगावच्या लॉजवर छापा, कुंटणखान्याचा पर्दाफाश

बार्शी अन्‌ जामगावच्या लॉजवर छापा, कुंटणखान्याचा पर्दाफाश

Next

याबाबत सपोनि. शामराव गव्हाणे यांनी फिर्याद दिली असता लॉज व्यवस्थापक संजय ज्ञानोबा टाळके (वय ३९, रा. इंदिरानगर भूम), मालक चंद्रकांत पवार (रा. बार्शी), तसेच सागर मनोहर लोखंडे (वय २०, रा. वाणेवाडी, ता. बार्शी), अजय गिराम (वय २२, रा. गोरमाळे, ता. बार्शी), सैफन महिबूब शेख (वय ३०, रा. बारंगुळे प्लॉट, अमन चौक, बार्शी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बार्शी- लातूर रस्त्यावरील लॉजवर बाहेरील महिला आणून वेश्याव्यवसाय चालतो, अशी गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री करून छापा टाकला. त्यावेळी तेथे ७ पीडित महिला व तिघे महिलेशी अश्लील चाळे करत होते. त्यावरून याठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पीडित महिला व आरोपींना ताब्यात घेतले.

याबरोबरच तालुका पोलिसांनीही जामगाव आ. हद्दीतील लॉजवर छापा मारून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी लॉजमालक राजेंद्र भीमराव मराठे (रा. बार्शी) व दलाल श्रीहरी सुखदेव मुठाळ (वय २५, रा. खामगाव) या दोघांविरुद्ध पोलीस नाईक अप्पासाहेब लोहार यांनी तक्रार देताच गुन्हा दाखल केला. ही घटना ४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. बार्शी तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संशयित आरोपी एका पीडित महिलेस लॉजमध्ये आश्रय देऊन लैंगिक स्वैराचारासाठी वापर करून कुंटणखाना चालवीत असताना मिळून आले, अशा आशयाची फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.

Web Title: Raid on the lodge of Barshi and Jamgaon, exposure of Kuntankhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.