सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

By Appasaheb.patil | Published: May 28, 2023 05:13 PM2023-05-28T17:13:59+5:302023-05-28T17:14:52+5:30

१७ आरोपींना ताब्यात घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. 

raid on gambling den in sinnoor 17 accused in custody goods worth 1 4 million seized | सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथील बंद पडलेल्या चंदनाच्या कारखान्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १७ आरोपींना ताब्यात घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. 

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नुर येथे बेकायदेशीर जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या बातमीच्या अनुषंगाने सहा पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने गावातील बंद पडलेल्या चंदनाच्या कारखान्यामध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा कारवाई केली. सदर छापा कारवाईत जुगार खेळणारे १६ आरोपी व जुगार चालवणारा आरोपी असे एकूण १७ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार ५७० रुपये रोख रक्कम हस्तगत केली असून सदर घटनास्थळावरून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य व आरोपीत यांचे एकूण २४ मोटर सायकली असा एकूण १४ लाख २५ हजार ७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, श्रेणी पोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, पोहवा सलीम बागवान, पोहवा विजयकुमार भरले, पोना रवी माने, चापोशि दिलीप थोरात यांनी केली आहे.

Web Title: raid on gambling den in sinnoor 17 accused in custody goods worth 1 4 million seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.