करमाळ्यात हाॅटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:36+5:302021-07-03T04:15:36+5:30

करमाळा : शहरात एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर करमाळा पोलिसांनी धाड टाकून हॉटेल व्यावसायिकासह दोन ग्राहक व तीन ...

Raid on prostitution in hotel in Karmala | करमाळ्यात हाॅटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड

करमाळ्यात हाॅटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड

googlenewsNext

करमाळा : शहरात एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर करमाळा पोलिसांनी धाड टाकून हॉटेल व्यावसायिकासह दोन ग्राहक व तीन महिलांना रंगेहाथ पकडले.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन सुधाकर जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

करमाळा शहरात कर्जत रस्त्यावर एका हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या पथकाने धाड टाकली. हवालदार देवकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल पवार, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, जगताप व अन्य व्यक्ती खाजगी वाहनातून हॉटेल मानसी येथे आले.

यावेळी ग्राहक म्हणून गणेश बिडवे व पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांना पाठविले. या कारवाईत हॉटेल मालक, तीन महिला व दोन व्यक्ती आढळले. हॉटेल मालक संजय दिगंबर सरवदे हा एक हजार रुपये घेऊन महिला पुरविण्याचे काम करीत असल्याचे उघडकीस आले.

---

हॉटेलमालकासह तिघांवर गुन्हा

महिलांकडे चौकशी केली असता, पाचशे रुपये स्वत:ला आणि पाचशे रुपये हॉटेल मालकाला मिळतात, अशी माहिती पुढे आली. या कारवाईत संभाजी मधुकर रोटे (रा. खातगाव, कर्जत, जि. नगर) व शंकर बबन खटके (रा.पोथरे) हे सापडले. पोलिसांनी हॉटेल मालक व दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस पथक करीत आहे.

Web Title: Raid on prostitution in hotel in Karmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.