पंढरपुरात गुटखा विकणाऱ्या १२ पानशॉपवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:28 AM2021-09-09T04:28:03+5:302021-09-09T04:28:03+5:30
शहरातील अबरार पान शॉप, समीर पान शॉप, राजू पान शॉप, भगवती पान शॉप, भाजी मंडई कॉर्नर, पंचवटी पान शॉप, ...
शहरातील अबरार पान शॉप, समीर पान शॉप, राजू पान शॉप, भगवती पान शॉप, भाजी मंडई कॉर्नर, पंचवटी पान शॉप, श्रीमान पान शॉप, रिद्धी सिद्धी पान शॉप, हिंदुस्थान पान शॉप, गौस पान शॉप, हिंद पान शॉप, आसद पान शॉप, माउली पान शॉप या दुकानांची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या विविध ब्रॅण्डचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १२ पान शॉपमध्ये एकूण ३३ हजार ३२ रुपयांचा साठा आढळून आला आहे. ही सर्व दुकाने अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केली आहेत.
या प्रकरणी समीर रशीद बागवान, वसीम यासीन तांबोळी, सूरज मीलनसिंग राजपूत, इम्रान शौकत तांबोळी, गौस जेनुद्दीन तांबोळी, आरिफ मेहबूब सय्यद, गहिनीनाथ नवनाथ ठेकळे, मेहबूब इब्राहिम तांबोळी, सुनील ज्ञानेश्वर मोरे, किरण राजकुमार माने यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ५९ व भा.दं.वि. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ नुसार व रिद्धी सिद्धी पान शॉप, सरगम चौक, पंढरपूर व हिंदुस्थान पान शॉप, धनश्री हॉटेल जवळ, पंढरपूर या दुकानमालकाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ५९ व भा.दं.वि. कलम १८६, १८८, २७२, २७३ व ३२८, ३५३ नुसार पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो : पंढरपुरातील गुटखा विकणारे दुकान सील करताना अन्न व औषध विभागाचे अधिकारी.