एकाच दिवशी १३ ठिकाणी दारु विक्रेत्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:02+5:302021-07-08T04:16:02+5:30
करमाळा तालुक्यात मंगळवारी (ता. ६) रोजी पोलिसांनी वरकुटे, सालसे, मिरगव्हान, देवळाली, केत्तूर, अर्जुननगर, झरे आदी १३ ठिकाणी पोलीस निरीक्षक ...
करमाळा तालुक्यात मंगळवारी (ता. ६) रोजी पोलिसांनी वरकुटे, सालसे, मिरगव्हान, देवळाली, केत्तूर, अर्जुननगर, झरे आदी १३ ठिकाणी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने धाडी टाकून बेकायदा दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झालेले संशयित पुढील प्रमाणे व गावाचे नाव दत्तात्रय सीताराम वाघमारे (वरकुटे) सतीश अंकुश काळे (सालसे), सागर गणेश पायघन (अर्जुननगर), दशरथ मधुकर पवार (गौंडरे), भूषण बाळासाहेब फरतडे (अर्जुननगर), नागेश प्रभाकर पिंपळे (केत्तुर नं. २), विकास तात्या शिंदे (देवळाली), सचिव अर्जुन बोराटे (झरे), बापू पंढरीनाथ भिसे (देवळाली), कालिदास भगवान डिसले (मीरगव्हाण) याशिवाय आणखी काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एकाच दिवशी तब्बल १३ गुन्हे दाखल झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. करमाळा शहरात बेकायदा दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
---