रेल्वे मार्ग भूसंपादनाच्या खुणा दिसू लागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:10+5:302021-02-05T06:49:10+5:30
ब्रिटिशकाळापासून सन १९०७ मध्ये पंढरपूर ते लोणंद रेल्वे मार्गाचा विचार झाला. १९१२ मध्ये पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. या ...
ब्रिटिशकाळापासून सन १९०७ मध्ये पंढरपूर ते लोणंद रेल्वे मार्गाचा विचार झाला. १९१२ मध्ये पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. या मार्गाच्या पूर्ततेसाठी जवळपास ३२७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती, मात्र हा प्रकल्प दुर्लक्षित राहिला. सन २०१० पासून राज्यसभेचे माजी सदस्य व विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर-लोणंद रेल्वे सुरू करण्यासाठीचा मुद्दा राज्यसभेमध्ये प्रथम उचलून धरला. त्यावेळच्या तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी २०१६-१७ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून या रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर या मार्गाला अर्थसंकल्पात स्थान मिळाले. रेल्वेमंत्र्यांनी ११५० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली आणि तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली.
...तर विकासात भर पडणार
१०५ कि. मी. अंतराच्या मार्गाचे काम झाले पाहिजे, अशी जनभावना होती. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी कोणीही भरीव प्रयत्न केले नव्हते. पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग झाला तर लोणंद, फलटण, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या विकासात भर पडणार हा विचार मनी धरून रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर संसदेच्या पटलावर प्रथमच त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून त्याचा पाठपुरावा केला.
फोटो लाईन ::::::::::::::::::
पंढरपूर-लोणंद मार्गावर भूसंपादन केल्याच्या अशा खुणा दिसू लागल्या आहेत.