करमाळा येथे मालगाडीचे रेल्वे इंजिन रूळावरून घसरले; मोठी दुर्घटना टळली, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:07 IST2022-09-04T12:52:45+5:302022-09-04T13:07:22+5:30
सोलापूरकडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरुन मालगाडी जात होती.

करमाळा येथे मालगाडीचे रेल्वे इंजिन रूळावरून घसरले; मोठी दुर्घटना टळली, पाहा व्हिडिओ
करमाळा मध्य रेल्वेच्या सोलापूर - पुणे मार्गावर केम हद्दीत लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले आहेत. रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही दुर्घटना झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले आहे.
सोलापूरकडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरुन मालगाडी जात होती. या गाडीचे रेल्वे इंजिन घसरले आहे. त्यातील लुप लाईनवर हा प्रकार घडला. ब्रेक फेल झाल्यामुळे हा प्रकार झाला.
सोलापूर- करमाळा मध्य रेल्वेच्या सोलापूर - पुणे मार्गावर केम हद्दीत लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले आहेत. pic.twitter.com/4e7G48zNUn
— Lokmat (@lokmat) September 4, 2022