सोलापुरातील रेल्वे हॉस्पीटल करणार दर मिनिटाला होणार ५०० लिटर प्राणवायूची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 04:27 PM2021-10-14T16:27:04+5:302021-10-14T16:27:09+5:30
सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन
सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार झाला आहे.
या प्रकल्पाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेद्रसिंह परिहार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. कन्नन, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कांबळे आणि रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्लांटमुळे १०० रुग्णांची सोय होणार आहे.
------
लहान मुलांसाठी २० बेडची सुविधा...
लहान मुलांसाठी २० बेडची सुविधा करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याबरोबरच बेडची संख्या वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यात आले आहेत. बेडची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.
ठळक बाबी.....
- - १०० रुग्णांची होणार सोय
- - दर मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजनची होणार निर्मिती
- - दिल्ली येथून ऑक्सिजन प्लांटची यंत्रसामग्री आणण्यात आली
- - ४६.८८ लाख खर्च
- - हॉस्पिटलमध्ये एकूण सहा व्हेंटिलेटरचा समावेश
- - ८ आयसीयू बेडची सुविधा
- - ९७ टक्के रेल्वे कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण