दुहेरी करणासाठी रेल्वेचा ट्राफिक ब्लॉक; दक्षिण भारतात जाणाऱ्या आठ गाड्या रद्द

By Appasaheb.patil | Published: December 18, 2023 07:01 PM2023-12-18T19:01:46+5:302023-12-18T19:02:08+5:30

...सोलापूर विभागातून धावणाऱ्या आठ रेल्वे गाड्या २६ ते २९ डिसेंबर २०२३ पर्यंत रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Railway traffic block for doubling; Eight trains to South India cancelled | दुहेरी करणासाठी रेल्वेचा ट्राफिक ब्लॉक; दक्षिण भारतात जाणाऱ्या आठ गाड्या रद्द

दुहेरी करणासाठी रेल्वेचा ट्राफिक ब्लॉक; दक्षिण भारतात जाणाऱ्या आठ गाड्या रद्द

सोलापूर : दक्षिण पश्चिम रेल्वेतील हुबळी विभागात गुलेगुड्डा - बागलकोट सेक्शन दरम्यान एनआय आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामाकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रॉफिक ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक २६, २७ व २८ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. या दरम्यान, सोलापूर विभागातून धावणाऱ्या आठ रेल्वे गाड्या २६ ते २९ डिसेंबर २०२३ पर्यंत रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

गुलेगुड्डा - बागलकोट सेक्शन (१३ किमी) दुहेरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजित आहे. दरम्यान १९ डिसेंबर २०२३, २६ डिसेंबर रोजी साई नगर शिर्डी- मैसूर एक्स्प्रेस ही व्हाया होटगी, कलबुर्गी, वाडी, गुंतकल मार्गे धावणार आहे. तर २८ डिसेंबर २०२३ रोजी विजापूर- यशवंतपूर एक्स्प्रेस ही विजापूर रेल्वे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ६० मिनिटे ३० मिनिटे उशिरा सुटणार आहे. तरी प्रवाशांनी रद्द व गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलांची माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असून पर्यटनासाठी लोक मोठया प्रमाणात रेल्वेने प्रवास करीत आहेत. एक्सप्रेस, मेल व वंदे भारत गाड्यांचे तिकिट वेटिंग मिळत आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची नावे

* हुबळी-बिजापूर एक्स्प्रेस रद्द- बिजापूर-हुबळी एक्स्प्रेस रद्द

* धारवाड - सोलापूर एक्स्प्रेस रद्द

* सोलापूर- हुबळी एक्स्प्रेस रद्द

* सोलापूर- होसपेठ एक्स्प्रेस रद्द

* होसपेठ -सोलापूर एक्स्प्रेस रद्द

* हुबळी-बिजापूर एक्स्प्रेस रद्द

* बिजापूर-हुबळी एक्स्प्रेस रद्द

Web Title: Railway traffic block for doubling; Eight trains to South India cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.