सोलापुरात रेल्वेचे चाक घसरले, वाहतुक खोळंबली
By रूपेश हेळवे | Published: June 12, 2024 07:44 PM2024-06-12T19:44:52+5:302024-06-12T19:45:04+5:30
मालवाहतुकीची गाडी असल्याने यामुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही
सोलापूर : शहरातील नजीकच असलेल्या होटगी परिसरात मालवाहतूक रेल्वे गाडीच्या शेवटचा गार्डचा डबा घसरला. ही मालवाहतुकीची गाडी असल्याने यामुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही. पण या ठिकाणाच्या जवळच रेल्वे गेट आहे. यामुळे रेल्वे गेट ओलाडणार्या प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले.
होटगी परिसरात असलेल्या सिमेंट फॅक्टरीला विविध राज्यातून कच्चा माल पुरविला जातो. यासाठी विषेश रेल्वेच्या माध्यमातून कच्च्या मालाची वाहतूक केली जाते. यासाठी कंपनीची खासगी पटरी त्या परिसरात असून, त्या कंपनीला माल पुरवठा करणार्या मालवाहतूक गार्डचा डबा घसरला. यामुळे हा डबा फक्त रुळाच्या बाजूला जाऊन सरकला, पण कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.