पुण्याला पाऊस आला.. आता आपल्याकडेही येईल; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज 

By शीतलकुमार कांबळे | Published: September 2, 2023 03:06 PM2023-09-02T15:06:19+5:302023-09-02T15:06:56+5:30

पाऊस लांबल्यामुळे खरिपाची पिके हातची जात आहेत. यापूर्वी मुळेगाव परिसरात २९.६ पाऊस झाला.

Rain came to Pune.. Now it will come to solapur too; Good rain forecast in September | पुण्याला पाऊस आला.. आता आपल्याकडेही येईल; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज 

पुण्याला पाऊस आला.. आता आपल्याकडेही येईल; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज 

googlenewsNext

सोलापूर : मागील काही दिवसांपासून गेलेला पाऊस आता परतला आहे. पुण्यामध्ये शनिवार २ सप्टेंबर रोजी पाऊस झाला. त्यामुळे आता सोलापुरातही मंगळवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज कृषी हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

शनिवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यात जोरात पावसाला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील तीन ते चार वर्षांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडतो. हेच दिवस मुख्य पावसाचे दिवस असतात. आता सप्टेंबर महिना सुरु झाला असून या महिन्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पाऊस लांबल्यामुळे खरिपाची पिके हातची जात आहेत. यापूर्वी मुळेगाव परिसरात २९.६ पाऊस झाला. पण, हा पाऊस मोजक्याच ठिकाणी पडला. तर इतर ठिकाणी पाऊस पडला नव्हता. यामुळे सोयाबिनचे मोठे नुकसान होत आहे.

सोयाबिनचे क्षेत्र वाढले
मागील तीन ते चार वर्षांत सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पीक पद्धतीत बदल होताना दिसत आहे. पूर्वीपासून सांगली, कोल्हापूर आदी परिसरात सोयाबिनचे पीके घेण्यात येतात. मात्र, सोलापूर जिल्ह्यातही मागील काही वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी हे सोयाबिनकडे वळले आहेत.

Web Title: Rain came to Pune.. Now it will come to solapur too; Good rain forecast in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस