उत्तर तालुक्यातून मतदार यादीवर हरकतींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:16+5:302020-12-09T04:17:16+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने नव्याने निवडणुका होणार आहेत. मुदत संपल्याने प्रशासक नियुक्ती केली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने नव्याने निवडणुका होणार आहेत. मुदत संपल्याने प्रशासक नियुक्ती केली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी प्रसिद्ध केली असून, सोमवारी हरकती घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजअखेर २४ पैकी १९ ग्रामपंचायतींच्या मतदार यादीवर २९८ हरकती आल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. यावर दोन दिवसात मंडल अधिकारी व तलाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून निर्णय घेणार आहेत.
सर्वाधिक ९७ हरकती एकरुख-तरटगावच्या आहेत. हगलूरच्या ४४, तिऱ्हे येथील ३६, गुळवंचीच्या ३२, तळेहिप्परगा येथील २८, नान्नजच्या २३, बिबीदारफळच्या ८, कोंडीच्या ७, वांगी व पाथरीच्या प्रत्येकी चार, खेड येथील तीन, साखरेवाडी, पडसाळी, वडाळा व बेलाटी प्रत्येकी दोन, भागाईवाडी, भोगाव, बाणेगाव व कळमण या गावांतील प्रत्येकी एक याप्रमाणे २९८ हरकती आल्या आहेत. होनसळ, सेवालालनगर, हिरज, राळेरास व तेलगाव या गावातील एकही हरकत आली नसल्याचे सांगण्यात आले.
----