सात तालुक्यांत पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:10+5:302021-09-27T04:24:10+5:30

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. ...

Rainfall in seven talukas | सात तालुक्यांत पावसाचे थैमान

सात तालुक्यांत पावसाचे थैमान

Next

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबरपर्यंत ५०७ मि.मी. म्हणजे १०५.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५५८ मि.मी. म्हणजे १२२ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६३७ मि.मी. म्हणजे ११५.४ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि. मी. अपेक्षित असताना ६३८ मि.मी. म्हणजे १२०.७ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि. मी. अपेक्षित असताना ५८६ मि. मी. म्हणजे १०९.३ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४८६ मि. मी. म्हणजे ११२ टक्के, अक्कलकोट ५४३.४ मि.मी. ऐवजी ५५२ म्हणजे १०१ टक्के, तर सांगोला तालुक्यात ४६८ मि.मी. म्हणजे १०० टक्के पाऊस पडला आहे.

पंढरपूर तालुक्यात ९६.६ टक्के, माढा तालुक्यात ९६.६ टक्के, करमाळा तालुक्यात ८८.६ टक्के, तर माळशिरस तालुक्यात ८७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चौकट

२५ तलाव ओसंडून वाहू लागले

जिल्ह्यातील चार बोरी, हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव, तर २१ लघू होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, कारी, शेळगाव, चारे, कळंबवाडी, तावडी, जवळगाव, वैराग, काझीकणबस व बीबीदारफळ हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, घोळसगाव या तलावांत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. रामपूर तलावात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.....................

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख-हिप्परगा मध्यम प्रकल्पात ७७.३२ टक्के (१.६७ टी.एम.सी.) पाणी आले आहे. मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के, तर हिंगणी, जवळगाव, बोरी व ढाळेपिंपळगाव हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

................

सात मध्यम तलावात १८१.४९ द.ल.घ.मी. म्हणजे ६.४१ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

५६ लघू तलावांत ६२.२७ दलघमी म्हणजे ४६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.................

जून महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस वगळता एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. पिकात पाणी आहे. शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत तातडीने द्यावी.

- अमोल पाटील, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना.

Web Title: Rainfall in seven talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.