सोलापूरात लग्नाच्या आहेराच्या पैशांमधून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम

By admin | Published: May 8, 2016 11:50 AM2016-05-08T11:50:12+5:302016-05-08T11:50:12+5:30

वैराग गावातील तुळशीदास नगरमधल्या सचिन आणि प्रतिक्षा आतकरे यांनी आहेराच्या पैशांसह काही रक्कम टाकून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं आहे.

Rainwater harvesting work in Solapur | सोलापूरात लग्नाच्या आहेराच्या पैशांमधून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम

सोलापूरात लग्नाच्या आहेराच्या पैशांमधून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम

Next

ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. ८ - सोलापुरातील एका नवदाम्पत्याने लग्नानंतर गावकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. वैराग गावातील तुळशीदास नगरमधल्या सचिन आणि प्रतिक्षा आतकरे यांनी आहेराच्या पैशांसह काही रक्कम टाकून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं आहे. 
 
सचिन आतकरे आणि प्रतिक्षा १६ एप्रिलला विवाहबंधनात अडकले. सचिन पुण्यातील आयटी कंपनीत अभियंते आहेत, तर प्रतिक्षा यांचे अभियांत्रिकीचे पदव्युतर शिक्षण सुरु आहे. लग्नात नातेवाईकांकडून जमलेले आहेराचे ३५ हजार रुपयात स्वतः कडील एक लाख २५ हजार रुपयांची भर घातली. त्यातून गावातल्या घरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचं काम सुरु केलं. 
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतकरे दाम्पत्याने पावसाचं पाणी साठवण्याचा केलेला निर्धार कौतुकास्पद ठरत आहे. गावातील ५० घरांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असून रोज दहा घरांतील काम केलं जात आहे.
 
 

Web Title: Rainwater harvesting work in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.