पोलीसपाटलावर उचलला हात; एकजण गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:56+5:302021-06-19T04:15:56+5:30
गतवर्षी कोरोना महामारीत मेडद (ता. माळशिरस) येथील पोलीसपाटील जालिंदर मोहन शेगर हे कोरोना संदर्भात कृती समितीचे कामकाज करत असताना ...
गतवर्षी कोरोना महामारीत मेडद (ता. माळशिरस) येथील पोलीसपाटील जालिंदर मोहन शेगर हे कोरोना संदर्भात कृती समितीचे कामकाज करत असताना संतोष धोंडिबा चौगुले (वय ३६, रा. वाशी नाका, चेंबूर मुंबई) हा मेडद गावात होमक्वारंटाइन असताना गावात विनामास्क फिरत होता. यावर पोलीसपाटील जालिंदर शेगर यांनी विनामास्क फिरण्याबाबत विचारणा केली. यावेळी त्याने शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्याने मारहाण करून शासकीय कामात अडथळा केला.
याबाबत माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर संतोष चौगुले मेडद गावातून मुंबईला गेला होता. संशयित आरोपी मोबाइल वापरत नव्हता. तब्बल दहा महिने त्याचा शोध घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हाती सापडला. यात पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके, दत्ता खरात, सोमनाथ माने यांच्या पथकाने मुंबई येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले आहे.