राज ठाकरे यांना साहित्यातलं फारसे काही कळत नाही, मात्र ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत, ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:18 PM2018-01-17T14:18:08+5:302018-01-17T14:21:20+5:30

राज ठाकरे यांनी साहित्यिकांकडून  बोलण्याची व लिहिण्याची अपेक्षा केली असली तरी मुळात राज ठाकरे यांना साहित्याबद्दल फारसे कळत नाही, अशी टीका  बडोदा येथे होणाºया ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सोलापुरात केली.

Raj Thackeray does not understand much about literature, but agrees with Thackeray's role, Laxmikant Deshmukh's newly elected president of Marathi Sahitya Sammelan | राज ठाकरे यांना साहित्यातलं फारसे काही कळत नाही, मात्र ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत, ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची टिका

राज ठाकरे यांना साहित्यातलं फारसे काही कळत नाही, मात्र ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत, ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची टिका

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीबाबत साहित्यिक कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीतमराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो़ पालकांनाही अति इंग्रजी प्रेम आणि त्याबाबतचा भ्रम हे अत्यंत चुकीचे आहे़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७  : राज ठाकरे यांनी साहित्यिकांकडून  बोलण्याची व लिहिण्याची अपेक्षा केली असली तरी मुळात राज ठाकरे यांना साहित्याबद्दल फारसे कळत नाही, अशी टीका  बडोदा येथे होणाºया ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सोलापुरात केली. तथापि  राज यांचे  वक्तव्य थोडेसे चुकीचे असले तरी त्यांच्या  भूमिकेशी सहमत असल्याची पुष्टीही देशमुख यांनी जोडली.  
मंगळवारी सोलापुरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते़ यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने  त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी सांगली येथील औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहत ‘महाराष्ट्रातील साहित्यिक गप्प का?’ अशी टीका केली होती़ ‘समाजाची मशागत करणे साहित्यिकांचे काम आहे़ लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे़ पण महाराष्ट्राच्या सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीबाबत साहित्यिक कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीत’ अशा शब्दात ठाकरे यांनी साहित्यिकांना फटकारले होते़  त्याबाबत बोलताना  देशमुख म्हणाले की, समाजात जे काही घडतंय त्यावर साहित्यिकांनी बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे़ लेखकाने सत्यता पाहून अभिव्यक्तही व्हायला हवे, सर्व पायºया तपासल्या पाहिजेत़ त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरी
प्रश्न : महसूल अधिकारी आणि साहित्य या दोन परस्परविरोधी टोकाच्या गोष्टी आणि त्या जमवून घेताना प्रवास उलगडा?
देशमुख : दोन वर्षांपूर्वी महसूल खात्यातून ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा करुन सेवानिवृत्त झालो़ या सेवेत येण्यापूर्वी लेखक होतो़ आजपर्यंत २० पुस्तके लिहिली़ सात मराठी कादंबºया, पाच वैचारिक पुस्तके, इंग्रजीत काही कथा, कॉफी टेबल असे विपुल लेखन करत साहित्य क्षेत्रात प्रवेश केला़ यापैकी सामाजिक सलोख्यावर आधारित ‘अंधेर नगरी’ कादंबरीची विशेष चर्चा झाली़ समाज कसं असावं आणि जगणं कसं असावं?याची ‘ब्लूप्रिंट’ आपण साहित्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे़ 
प्रश्न: संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आजचे साहित्य आणि समाज याबाबत आपणास काय अपेक्षित आहे?
देशमुख : साहित्यातून आधुनिक समाज निर्माण झाला पाहिजे़ विज्ञाननिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे़ साहित्यातून विवेकवादाचा पाया भरला पाहिजे़ मानवतावादावर मूल्यांकन होऊन आधुनिक समाज निर्माण होत असतो़ हीच प्रक्रिया आता सुरु आहे़ 
प्रश्न : साहित्य आणि प्रशासन यांची सांगड कशी घातली?
 देशमुख : इस्लाम नावाने मूठभर लोक दगाबाज करत दहशतवाद कसा पत्करतात हे आपण आपल्या साहित्यातून रेखाटले आहे़ १९९० च्या दरम्यान एककीडे अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएतमध्ये शीतयुद्ध रंगले़ यादरम्यान सोव्हिएतचे १५ तुकडे झाले होते़ या आंतरराष्ट्रीय बदलावर सर्वप्रथम आपण कादंबरीच्या माध्यमातून लष्करी बंड रेखाटले़ याशिवाय पाणी टंचाई, भूकबळी यावर विपुल लेखन करत भूकबळी कुटुंबाची कहाणी लिहिली़ या काळात सोलापूरचाही संबंध आला़ मनीषा वर्मा जिल्हाधिकारी असताना वा़ उ़ तडवळकर यांच्या बालकामगार प्रकल्पाला भेट दिली़ बालकामगारांचे करपून गेलेले बालपण येथे पाहायला मिळाले़ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सेवेत असताना गर्भवतीची प्रकृती तपासणीच्या नावाखाली लिंग निदान करणाºया डॉक्टरांचा छडा लावला़ त्यामुळे जिल्ह्यात मुलींचा जनन दर वाढला आणि याची सरकारने दखल घेत माझा गौरव केला़ यावर ‘सावित्रीच्या गर्भात मारल्या गेलेल्या लेकी’ पुस्तक लिहिले़
प्रश्न: दाभोळकर हत्या ते आजची न्यायव्यवस्था याबाबत काय सांगाल? 
देशमुख : दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा सर्वप्रथम निषेध आपण व्यक्त केला़ आजच्या न्यायव्यवस्थेवर चार न्यायाधीशांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली, ते अयोग्यच होते़ दुसºया दिवशी ते हा विषय मिटला म्हणतात, तर मग तो विषय त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे नेऊन सार्वजनिक का केला? कुठला प्रश्न मिटला, हे त्यांनी सांगितले नाही़ त्यांचे असे वर्तन अनपेक्षित असून, आपली तक्रार त्यांना वरच्या न्यायालयात मांडता आली असती़ 
प्रश्न : मराठी भाषा आणि त्यासमोरील आव्हाने यावर काय सांगाल?
देशमुख : मराठी भाषेची खरोखरच गळचेपी होतेय़ मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो़ पालकांनाही अति इंग्रजी प्रेम आणि त्याबाबतचा भ्रम हे अत्यंत चुकीचे आहे़ दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्थानिक भाषा दैनंदिन व्यवहार, प्रशासकीय कामकाज आणि शिक्षणात सक्तीची आणि अनिवार्य केली आहे़ परंतु असे महाराष्ट्र सरकार का करत  नाही ते कळत नाही?  ही स्थिती अशीच राहिली तर येत्या १०-१२ वर्षात मराठी संस्कृती तुटणार आहे़या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला पाहिजे़ 
प्रश्न: साहित्य संंमेलनाचे बदलते स्वरुप आणि हाती काय लागत नाही याबाबत काय सांगाल?
देशमुख : वाढत्या खर्चावरुन आजच्या साहित्य संमेलनावर टीका होतेच़ परंतु दोन किंवा तीन वर्षाला एकदा संमेलन घ्या म्हणणे हे काही योग्य नाही़ अलीकडे संमेलने होताहेत त्याला मी ‘शारदोत्सव’ म्हणेऩ लेखक, कलावंतांसाठी हे संमेलन आवश्यक आहे़परंपरा मोडून काही नवीन निर्माण करायचेच नाही तर त्यात बदल किंवा खंडित कशासाठी करता? उलट मराठी संमेलनाचे अनुकरण करत इतर राज्यात त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये संमेलने होताहेत़ यापुढील साहित्य संमेलनातून हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करु़ भारताबाहेरील लोकांना मराठी भाषा आॅनलाईन शिकवण्याचा प्रयत्न राहील़ साहित्य परिषदेच्या माध्यमातून काही कोर्सेस सुरु करण्याचा प्रयत्न राहील़ 
यांच्या वक्तव्याला देशमुख यांनी वरील उत्तर दिले़ संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे स्वागत केले़ यावेळी मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांची उपस्थिती होती़ 

Web Title: Raj Thackeray does not understand much about literature, but agrees with Thackeray's role, Laxmikant Deshmukh's newly elected president of Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.