झेंड्याप्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत; रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 12:12 PM2022-05-05T12:12:20+5:302022-05-05T12:12:26+5:30

राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

Raj Thackeray is changing the colors of his roles like a flag; Ramdas remembered | झेंड्याप्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत; रामदास आठवले

झेंड्याप्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत; रामदास आठवले

Next

सोलापूरराज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

रामदास आठवले आज सोलापूर दौर्‍यावर आहेत .शासकीय विश्रामगृह येथे सकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. मध्येच राज ठाकरे यांनी मशिदीवरील स्पीकर काढावेत त्यांच्या समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका घेतली आहे हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे. धर्माचा बुरखा घालून कोणी संविधाना विरोधात काम करत असेल तर आमचा त्यांना विरोध असेल.

 आठवले म्हणाले, सोलापुरात मुस्लिम समाजाच आपल्याला निवेदन आले आहे. पोलीस बळजबरीने राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून मशिदी वरील स्पीकर काढायला लावत आहेत. पोलिसांनी अशी भूमिका घेऊ नये. कायद्याचं पालन करावं. धार्मिक स्थळावरील स्पीकर उतरवताना समान भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. राज ठाकरे यांना एनडीएमध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई मोदी सरकार बरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय? असा सवालही आठवले यांनी केला.

ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा समाजाला मिळणार आरक्षण असो राज्य सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास अपयशी ठरलं आहे. आता या सरकारची जबाबदारी आहे, उभयतांना आरक्षण मिळवून द्यावं. भूमिहीनांना देशात प्रत्येकी पाच एकर जमीन कसण्यासाठी द्यावी. 20 कोटी एकर अतिरिक्त जमीन शिल्लक आहे असं सांगून आठवले म्हणाले, दोन हजार पर्यंत पर्यंत च्या गायरान वरील अतिक्रमणाच्या जागा संबंधितांच्या नावे कराव्यात. तसेच 2019 पर्यंतच्या झोपड्याअधिकृत कराव्यात अशी आमची मागणी आहे.  यावेळी पत्रकार परिषदेस रिपाईचे राजा सरवदे, के.डी कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Raj Thackeray is changing the colors of his roles like a flag; Ramdas remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.