रजनीकांतचा लाभ काँग्रेसला अधिक होईल, सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूरात वक्तव्य, बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:41 PM2018-01-01T15:41:39+5:302018-01-01T16:18:41+5:30
रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू झाली
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपट अभिनेता रजनीकांत यांनी प्रवेश केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ काँग्रेस पक्षाला होईल असे वक्तव्य पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले.
तमिळ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका रविवारी जाहीर केली. गेली अनेक वर्षे त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा होती ,परंतु दस्तुरखुद्द रजनीकांत याविषयी फारसे बोलत नव्हते, योग्य वेळी ते आपली भूमिका जाहीर करतील अशी अटकळ राजकीय क्षेत्रात बांधली जात होती. तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात जयललिता यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली, त्यामुळे रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला अर्थ होता़ अखेर रजनीकांत यांनी वर्षा अखेरचा मुहूर्त काढला आणि राजकारण प्रवेशाचा बार उडवून दिला.
रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू झाली, याकडे सुशीलकुमार शिंदे यांचे लक्ष्य वेधले असता ते म्हणाले, रजनीकांतच्या राजकारण प्रवेशामागे कोणीही असले तरी त्याचा फायदा प्राप्त परिस्थितीत काँग्रेसला अधिक होईल़ मात्र याबद्दल खुलासा करण्याचे त्यांनी टाळले.
सध्या शिंदे सोलापूर दौºयावर आहेत. आठ दिवसाचा त्यांचा नियोजित दौरा होता, मात्र बुधवारी सायंकाळी दिल्लीत पक्ष्याध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याने दौरा आटोपता घेत बुधवारी सकाळी ते दिल्लीला जाणार आहेत़ तामिळनाडूच्या राजकीय घडामोडीवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.