महूदमधील छत्रपती घराण्याच्या जागेसंदर्भातील प्रश्नासाठी राजमाता सोलापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:56 PM2018-12-01T12:56:56+5:302018-12-01T13:01:51+5:30
अधिकाºयांची भेट घेऊन केली मागणी
सोलापूर : साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सांगोला तालुक्यातील महूद येथील छत्रपती भोसले घराण्याच्या जागेवर चाललेले पाच मजली अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी दुपारी येथील झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे केली आहे.
राजमाता कल्पनाराजे भोसले या शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला झेडपीमध्ये आल्या. त्यांनी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन तक्रारी अर्ज दिला. सांगोला तालुक्यातील महूद बु. येथे मालमत्ता क्र. ७२६/१ ही भोसले घराण्याची आहे. या जागेवर उत्तम मारुती खांडेकर (रा. नवी लोटेवाडी, ता. सांगोला) यांनी सिटी सर्व्हे क्र. १३०/२ अन्वये रेखांकन मंजूर करून घेऊन पाच मजली बांधकाम सुरू केले आहे. या मिळकतीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या बांधकामाचे रेखांकन रद्द करावे व जागेवर सुरू असलेले बांधकाम तातडीने पाडून टाकावे, असे नमूद केले आहे.
या जागेवर मंजूर केलेल्या रेखांकनास हरकत घेतली होती. तरीही मंजूर रेखांकन आराखड्याविरुद्ध अनधिकृत बांधकाम नियमांची पायमल्ली करून करण्यात आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने पाडून टाकण्यात यावे, अशी मागणी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केली आहे. खांडेकर यांच्या तीन पिढ्यांनी भोसले यांच्या जागेवर रहिवास केला आहे, पण आता कोणतीही परवानगी न घेता त्यांनी जागेवर बांधकाम केले आहे. याबाबत राजमाता भोसले यांचे कर्मचारी विचारणा करण्यास गेल्यावर खांडेकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविला आहे. लोक खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. त्यामुळे कायदेशीर मार्गाने जागेबाबत तक्रार करीत असल्याचे राजमाता कल्पनाराजे यांनी म्हटले आहे.
पिस्तूल परवाना रद्द करा
- राजमाता कल्पनाराजे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचीही भेट घेतली. अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यास गेलेल्या कर्मचाºयांवर खांडेकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे सांगितले. भोसले घराण्याच्या बºयाच ठिकाणी जमिनी आहेत. त्याची माहिती घेतली जात असल्याचे राजमाता कल्पनाराजे यांनी स्पष्ट केले.