राजश्री कल्याण यांचा नारीशक्ती पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:56+5:302021-05-29T04:17:56+5:30
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लिंबीतोट वस्ती नागणसूर येथील उपक्रमशील शिक्षिका राजश्री कल्याण यांना ...
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लिंबीतोट वस्ती नागणसूर येथील उपक्रमशील शिक्षिका राजश्री कल्याण यांना जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सर फाउंडेशन’ आयोजित ऑनलाइन उपक्रमद्वारे सत्कार समारंभ पार पडला. राजश्री कल्याण यांच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्ह्यातील ऑनलाइन उपक्रमाद्वारे १२ नारीशक्ती महिला शिक्षिकांना ट्राॅफी देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी शाळा स्तरावर पहिलीत दाखल झालेल्या मुलांना फक्त पंधरा दिवसांत शंभर टक्के वाचन, पाठ न करता पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी हजारो स्पेलिंग सांगणे हे टेक्निकने शिकवून सिद्ध करून दाखविले आहे. कार्यक्रमास शिक्षण उपसंचालक विकास गरड, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे, डायटचे प्राचार्य, सर्व अधिविख्याते, जिल्हा महिला समन्वयक अनघा जहागीरदार, जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण, माशाळे, शिक्षक शरणप्पा फुलारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वा. प्र.)
---
२८ राजश्री कल्याण