शाहीर शेख जन्मशताब्दीनिमित्त रॅली
By admin | Published: October 22, 2015 09:12 PM2015-10-22T21:12:39+5:302015-10-22T21:12:39+5:30
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असलेले बाश्रीचे सुपुत्र कॉ. शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाश्रीतील भगवंत मैदानावरून विद्यार्थ्यांनी रॅली काढली.
बाश्री : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असलेले बाश्रीचे सुपुत्र कॉ. शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाश्रीतील भगवंत मैदानावरून विद्यार्थ्यांनी रॅली काढली. यावेळी शाहीर अमर शेख अमर रहे, अमर शेख जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
ही रॅली येथील फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ-अमर शेख प्रतिष्ठान यांच्या वतीने काढण्यात येऊन रॅलीचा शुभारंभ कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते अमर शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला. या रॅलीचा समारोप न्यायालयासमोरील पुतळा पार्क येथील अमर शेख यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी बोलताना कॉ. तानाजी ठोंबरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या पहाडी आवाजाने शाहिरीच्या माध्यमातून अमर शेख यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत राहून महाराष्ट्र ढवळून काढला.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप अलाट, कार्याध्यक्ष बापू शितोळे, सचिव उमेश पवार, विनायक माळी, शौकत शेख, प्रवीण मस्तुद, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आंनद काशीद, किरण गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते. या रॅलीचे सर्व सूत्रसंचालन सचिव उमेश पवार यांनी केले. तर यामध्ये बाश्रीतील अनेक नागरिकही मोठया प्रमाणात सहभागी झालेले दिसत होते.(प्रतिनिधी) शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना कॉ. तानाजी ठोंबरे, जयकुमार शितोळे, संदीप आलाट, उमेश पवार तर दुसर्या छायाचित्रात बाश्री शहरात फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ-अमर शेख प्रतिष्ठान यांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी विद्यार्थी या रॅलीमध्ये शहरातील मॉडेल हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय, कन्या प्रशाला, सिल्व्हर ज्युबिली, साधना कन्या प्रशाला, जिजामाता कन्या प्रशाला, शं.नि. अध्यापक विद्यालय, कुंकूलोळ प्रशाला, सुलाखे हायस्कूल, सोजर इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील मुले, मुली व शिक्षक सहभागी होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली नेण्यात आली.