पेट्रोल, डिझेल अन् गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर मांडली चूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:39+5:302021-03-06T04:21:39+5:30
येथील गांधी चौकात महिला व नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर चूल मांडली. रिकामी गॅस टाकी आणून व सरपण गोळा ...
येथील गांधी चौकात महिला व नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर चूल मांडली. रिकामी गॅस टाकी आणून व सरपण गोळा करून प्रतीकात्मक विरोध केला. दरवाढीविरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला. तसेच गॅस, डिझेल, पेट्रोल याचे दर कमी करून महागाईला आळा घालण्याची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा शलाका मरोड - पाटील यांनी केली.
तत्पूर्वी आंदोलनकर्ते नाका नंबर तीन येथून बैलगाडीमध्ये मोटारसायकल, गॅस टाकी, सरपण व चूल मांडून गांधी चौकात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या तेजस्विनी मरोड, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुजे, नीता भालशंकर, शोभा थोरात, नफिसा काझी, सिफा पठाण, रुबिया शेख, दलितमित्र राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर, जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष आब्बास शेख, अरुण सावंत, समाधान पवार, बालाजी ठाकूर, विलास रेपाळ, बाबा शेख, मज्जिद शेख, कचरू यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
----०५वैराग-आंदोलन