पंढरपूर रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे

By Admin | Published: May 26, 2014 12:29 AM2014-05-26T00:29:36+5:302014-05-26T00:29:36+5:30

पोलीस चौकी रिकामी :नागरिकांची सुरक्षा धोक्यात

Ram Bharosi Protects Pandharpur Railway Station | पंढरपूर रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे

पंढरपूर रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे

googlenewsNext

 

पंढरपूर : येथील रेल्वे स्टेशनवर दररोज हजारो प्रवाशांची गर्दी होत असते, परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडून जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी रेल्वे पोलीस चौकीत फक्त हातावर मोजण्याइतकाच कर्मचारी वर्ग असल्याने रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणारे भाविक बस व खासगी वाहनाने येण्याऐवजी रेल्वेने येणे पसंत करतात. सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरील लोहमार्ग पोलीस चौकीत त्या तुलनेत पोलीस कर्मचार्‍यांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत नाही. यामुळे पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. १९ मे रोजी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वेचेच बांधकाम अभियंता कार्यालयाजवळ एका अनोळखी भाविकांचा खून झाल्याचे उघड झाले, परंतु सतत गर्दी असणार्‍या रेल्वे स्टेशनच्या परिसरात रात्री खून होऊनही त्याबाबत रात्रभर रेल्वे पोलिसांना कसलीच खबर लागली नाही. ही घटना सकाळी आठ वाजता उघडकीस आल्यानंतर त्याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती कळविण्यात आले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी खुनाच्या तपासाचा भाग म्हणून रेल्वे स्टेशनला भेट दिली, परंतु रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत फक्त एकच लोहमार्ग पोलीस कर्मचारी होता. इतर कर्मचार्‍यामध्ये दुसरा लोहमार्ग पोलीस खासगी कारणाने सुट्टीवर गेला, तिसरा साप्ताहिक सुट्टीमुळे आला नाही, चौथ्याला कामानिमित्त कुर्डूवाडीला बोलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले़

----------------------

खुनाची झालेली घटना आमच्या हद्दीत नव्हती. आमच्या लोहमार्ग पोलीस कर्मचार्‍याने याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कळवले होते. घटनेच्या तपासादिवशी रेल्वे स्टेशन चौकीतील एक कर्मचारी हजर होता व इतर लाईनवर कामानिमित्त बाहेर गेले होते. - श. बा. भालेराव सहायक पोलीस निरीक्षक,लोहमार्ग कुर्डूवाडी, पो. ठाणे

 

Web Title: Ram Bharosi Protects Pandharpur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.