स्टार्टर, मोटार गळ्यात बांधून विधानभवनात अवतरले राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:28+5:302021-03-04T04:40:28+5:30

शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत राज्यभर महावितरणने वसुली मोहीम राबविली आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. एकेकाळी ...

Ram entered the Vidhan Bhavan with a starter and a motor tied around his neck | स्टार्टर, मोटार गळ्यात बांधून विधानभवनात अवतरले राम

स्टार्टर, मोटार गळ्यात बांधून विधानभवनात अवतरले राम

Next

शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत राज्यभर महावितरणने वसुली मोहीम राबविली आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. एकेकाळी वीजबिल माफ करण्याची भाषा करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदतीऐवजी सावकारी वसुली सुरू केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे विधानसभेत शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी आमदार राम सातपुते यांनी गळ्यात स्टार्टर, मोटार व निषेधाचे बॅनर घालून सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकारच्या निषेधाची घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सरकारने मनमानीपणा थांबवावा

कोरोना काळातील थकबाकीदार शेतकरी, व्यापाऱ्यांना कोणतीही लेखी सूचना न देता क्रूरपणे वीजतोडणी सुरू आहे. हा शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांवर अन्याय आहे. या सरकारने हा मनमानीपणा व जुलूम तातडीने थांबवावा, अशी मागणीही माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी केली.

फोटो लाईन :::::::::::::::::::::

स्टार्टर व मोटारीसह निषेधाचे बॅनर्स गळ्यात बांधून वीजबिल वसुलीबाबतचा विधानभवनात निषेध करताना आ. राम सातपुते व अन्य.

Web Title: Ram entered the Vidhan Bhavan with a starter and a motor tied around his neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.