पुण्याच्या ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ला सोलापुरातील सुशील करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 01:26 PM2020-02-10T13:26:16+5:302020-02-10T13:28:12+5:30

राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा समारोप; ‘मोठा पाऊस आला आणि...’ला द्वितीय पारितोषिक

Ram Mohammed Singh Azad of Pune, Sushil Kandak in Solapur | पुण्याच्या ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ला सोलापुरातील सुशील करंडक

पुण्याच्या ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ला सोलापुरातील सुशील करंडक

Next
ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरकडून आयोजित राज्यस्तरीय सुशील एकांकिका स्पर्धेचा समारोप राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपट म्होरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर यांच्या हस्ते विजेत्या कलावंतांचा गौर

सोलापूर : राज्यस्तरीय सुशील करंडक एकांकिका स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पुणे येथील रुद्राक्षम थिएटर्स प्रस्तुत राम मोहम्मद सिंग आझादने पटकाविले आहे़ तर इचलकरंजी येथील रंगयात्रा नाट्य संस्था प्रस्तुत मोठा पाऊस आला आणि़.. या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे़ मुंबई येथील कलासक्त ओल्या भिंतीने या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे़ राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपट म्होरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर यांच्या हस्ते विजेत्या कलावंतांचा गौरव करण्यात आला़ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृती मंदिरात पारितोषिक वितरण समारंभ झाला.

स्मृती मंदिरात जल्लोष आणि आनंदाला उधाण आलेले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरकडून आयोजित राज्यस्तरीय सुशील एकांकिका स्पर्धेचा समारोप रविवारी झाला़ स्पर्धेचे यंदा बारावे वर्ष होते़ येथील स्मृती मंदिरात मागील तीन दिवस स्पर्धा सुरु होत्या़ मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, धनादेश तसेच सन्मानचिन्ह देऊन विजेत्या कलावंतांचा गौरव झाला़ यावेळी सोलापूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची, प्रमुख कार्यवाह प्रा़ ज्योतिबा काटे, भारत गॅसचे राजीव कुमार, आनंद खरबस, सुमित फुलमामडी, विद्या काळे, माजी महापौर नलिनी चंदेले, परीक्षक कीर्ती मानेगावकर, मदन दांडगे आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी अमर देवकर म्हणाले, चित्रपट किंवा नाटक निर्माण करताना आईला ज्या प्रसूती वेदना होतात, त्याच वेदना कलावंतांनाही होतात. चित्रपट तयार करणे ही एक कला आहे. कलावंतांनी कलेची सेवा करत करावी आणि कलेचा आनंद लुटावा़ संकटे अनेक येतात, संकटांना आपण घाबरू नये़ आपल्यासमोर संकटे आली आहेत, संकटांच्या अगोदर आपला जन्म झाला आहे़ त्यामुळे संकटे येतील, जातील आपण आहे त्या ठिकाणी ठाम उभे राहून लढायला शिकले पाहिजे तरच आपल्या हातून सृजनाचा जन्म होतो.

असा आहे निकाल...

  • उत्कृष्ट एकांकिका 
  • - प्रथम क्रमांक : पुणे येथील रुद्राक्षम थिएटर प्रस्तुत राम मोहम्मद सिंग आझाद
  • - द्वितीय : इचलकरंजी येथील रंगयात्रा नाट्य संस्था प्रस्तुत मोठा पाऊस आला आणि़़़
  • - तृतीय : मुंबई येथील कलासक्त प्रस्तुत ओल्या भिंती
  • - उत्तेजनार्थ : सांगली येथील लोकरंगभूमी प्रस्तुत आधे अधुरे
  • उत्तेजनार्थ : सोलापूर येथील गॅलेक्सी कल्चरल अ‍ॅन्ड वेल्फेअर ट्रस्ट प्रस्तुत सब्रान
  • उत्कृष्ट दिग्दर्शन
  • - प्रथम : सतीश वराडे, राम मोहम्मद सिंग आझाद
  • - द्वितीय : अभिजित केंगार, डी फॉर डिसीजन
  • - तृतीय : डॉ़ अमित मोरे, वन सेकंद लाईफ
  • उत्कृष्ट अभिनय, पुरुष 
  • - प्रथम : प्रसाद रणदिवे, राम मोहम्मद सिंग आझाद
  • - द्वितीय : अभिजित केंगार, डी फॉर डिसीजन
  • - तृतीय : मंगेश काकडे, बट बिफोर लिव्ह
  • - उत्तेजनार्थ : नितीन सावळे, ट्युलिप
  • - उत्तेजनार्थ : इरफान मुजावर, आधे अधुरे
  • उत्कृष्ट अभिनय, स्त्री 
  • - प्रथम : कोमल सारंगधर, ओल्या भिंती
  • - द्वितीय : कादंबरी माळी, मोठा पाऊस आला आणि़़
  • - तृतीय : कविता कांबळे, जुळवाजुळव
  • - उत्तेजनार्थ : केतकी सुर्डीकर, कौल
  • - उत्तेजनार्थ : पल्लवी दशरथ, विवर
  • उत्कृष्ट नेपथ्य
  • - प्रथम : तुषार कुडाळकर, मोठा पाऊस आला आणि़़
  • - द्वितीय : इरफान मुजावर, शेवट तितका गंभीर नाही
  • - तृतीय : ऋषिकेश शिंदे
  • उत्कृष्ट प्रकाश योजना
  • - प्रथम : प्रणव सपकाळे, राम मोहम्मद सिंग आझाद
  • - द्वितीय : योगेंद्र बांद्रे, फ्लेमिंगो
  • - तृतीय : देवदत्त सिद्धम, कॅलिडीस्कोप
  • उत्कृष्ट पार्श्वसंगीत
  • - प्रथम : वैभव जयस्वाल, बट बिफोर लिव्ह
  • - द्वितीय : वैष्णवी शेटे, शेवट तितका गंभीर नाही
  • - तृतीय : आरती बिराजदार, बिनविरोध
  • खास स्पर्धेसाठी लिहिलेल्या एकांकिका
  • - प्रथम : रायगड येथील व्ही़ बी़ एन्टरटेनमेंट प्रस्तुत अंगठा
  • - द्वितीय : मुंबई येथील नाटकनामा प्रस्तुत दाभोळकरांना दिसलेलं भूत
  • उत्कृष्ट बाल कलावंत
  • - प्रथम : पूर्वा जाधव, अंगठा
  • - द्वितीय : पृथ्वी तरे, बारकं मावरं

Web Title: Ram Mohammed Singh Azad of Pune, Sushil Kandak in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.