‘त्या’ चित्रपटासंदर्भात रमेश व्हटकर यांची आठवले यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:18+5:302021-07-03T04:15:18+5:30

कुरुल : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते रॉकसन ऊर्फ रमेश व्हटकर यांनी केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांची भेट ...

Ramesh Whitkar's discussion with Athavale regarding the film 'Tya' | ‘त्या’ चित्रपटासंदर्भात रमेश व्हटकर यांची आठवले यांच्याशी चर्चा

‘त्या’ चित्रपटासंदर्भात रमेश व्हटकर यांची आठवले यांच्याशी चर्चा

Next

कुरुल : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते रॉकसन ऊर्फ रमेश व्हटकर यांनी केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांनी रोटेशनवर बनवलेला चित्रपट ‘एक उडान हौसलोसे भरी’ सेन्सॉरने प्रदर्शित करण्यापासून रोखला असल्याची माहिती दिली.

हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी आठवले यांनी सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याची ग्वाही दिली.

७३ व ७४वी घटना दुरुस्ती करून तत्कालीन सरकारने जे राजकारणात संधी देणारे सात सेक्टर आहेत त्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये रोटेशन पद्धती ठेवून एससी, एसटी, ओबीसी यांना आरक्षणाप्रमाणे महत्त्वाचे पद म्हणजे महानगरपालिकेत महापौर, नगरपालिकेत नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेत अध्यक्षपद, पंचायत समितीत सभापतिपद व ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद रोटेशनने दिलेले आहे. मग फक्त दोन सेक्टर विधानभवन व भारत सरकारच्या संसदेतच रोटेशन का नाही, असा सवाल यामध्ये प्रामुख्याने विचारण्यात आला आहे. (वा. प्र.)

फोटो : रॉक्सन

सेन्सॉरने रोखलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रमेश व्हटकर यांनी रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Ramesh Whitkar's discussion with Athavale regarding the film 'Tya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.