लसीकरण, अँटिजन टेस्टमध्ये रामपूर-इटगे अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:49+5:302021-06-11T04:15:49+5:30
गावातील फ्रंटलाइन कर्मचारी आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांनी मैंदर्गी व अक्कलकोट येथे लसीकरण करून घेतलेले आहे, त्यामुळे गावाची ओळख आता ...
गावातील फ्रंटलाइन कर्मचारी आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांनी मैंदर्गी व अक्कलकोट येथे लसीकरण करून घेतलेले आहे, त्यामुळे गावाची ओळख आता मूर्ती लहान; पण कीर्ती महान अशी निर्माण झाली आहे.
एकाच दिवशी दोन्ही गावात मिळून दोनशे लोकांनी अँटिजन टेस्ट करून घेतली आहे, तर बुधवारी एकाच दिवशी शंभरहून अधिक लोकांचे लसीकरण झाल्यामुळे रामपूर-इटगे येथे ४४ वर्षांआतील वगळता लसीकरण जवळपास पूर्ण झालेले आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून कौतुक होत आहे. याकामी सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, पोलीसपाटील, आरोग्य विभागाचे डॉ. ए.एन.दबडे, पी.सी. बळोरगी, एन. एस. चव्हाण, अंगणवाडीसेविका दीपाली उंबरजे, जे.ए. एखंडे, आशा सुभद्राबाई सुतार, ऑपरेटर फिरोज शेख, सेवक शिवपुत्र रेऊरे, राहुल सुतार आदींनी परिश्रम घेतले.
----
दोन्ही गावे लोकसंख्येने लहान
फ्रंटलाइन कर्मचारी व स्थलांतरित नागरिकवगळता दोनशेपर्यंत लोक या मोहिमेपासून गावी शिल्लक होते. १८० अँटिजन टेस्ट व १७० लोकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. आता ४५ वर्षांच्या आतील युवक लसीकरणापासून शिल्लक राहिलेले आहेत. मैंदर्गी विभागात दोन्ही शिबिरात सर्वाधिक सहभाग दर्शविणारे एकमेव गाव म्हणून कौतुक होत आहे.
----
फोटो : ०९ अक्कलकोट रामपूर
रामपूर येथे नागरिकांना लस देताना आरोग्य कर्मचारी. समवेत लाभार्थी नागरिक.
----