शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल, शहरात झाले जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:10 PM2018-07-16T14:10:09+5:302018-07-16T14:13:59+5:30

ओम गजानन... श्री गजानन ज्ञानोबा, माऊली, तुकाराम.....च्या जयघोषात पालखीचे आगमन झाले़

Rana of Shegavichi falls in Solapur district, welcome to the city | शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल, शहरात झाले जल्लोषात स्वागत

शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल, शहरात झाले जल्लोषात स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा गजानन महाराज पालखीने ५१ वर्षे पूर्ण केली़या पालखीसोबत ७०० वारकरी, अश्व आणि वाहने असा लवाजमा अतिदक्षता म्हणून अ‍ॅम्ब्युलन्स गाडी, डॉक्टर आणि औषधसाठा सोबत

सोलापूर : ओम गजानऩ़़ श्री गजानऩ़़ज्ञानोबा, माऊली, तुकाराम़़़च्या जयघोषात ३३ दिवसांचा प्रवास करीत शेगावच्या संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.

 उळे गावाच्या हद्दीत  पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, यांंनी या दिंडीचे स्वागत केले. सायंकाळी ही पालखी  उळे गावात विसावली़ दरम्यान सोमवारी सकाळी पालखी सोलापूर शहरात दाखल होत असून रात्री कुचन हायस्कूल येथे मुक्कामी जाणार आहे.  

गेल्या ५१ वर्षांपासूनची परंपरा पाळत गजानन महाराजांच्या पालखीचे ३३ दिवसांपूर्वी शेगाव येथून प्रस्थान झाले़ टाळ-मृदंग आणि पांढºया वेशातील वारकरी खांद्यावर पताका घेऊन मैलोन्मैल पार करत ‘ओम गजानऩ़़श्री गजानऩ़़’चा जयघोष करीत दिंडीने सोलापूरजिल्ह्यात  प्रवेश केला़

यंदाही वारकºयांची संख्या वाढलेली दिसून आली़ वाटेत अनेक सामाजिक संघटना, संस्थांनी या दिंडीला जेवण, अल्पोपहार देऊन स्वागत केले़ रविवारी पहाटे तुळजापूरच्या बालाघाटातून ही दिंडी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली़ यावेळी पावसाच्या सरींनी शिडकावा केला़ या सरी अंगावर घेत वारकºयांनी ‘ओम गजानऩ़़श्री गजानऩ़़’चा गजर सुरु ठेवला़ विविध फुलांनी सजवलेल्या पालखीतून गजाननांचे मुखदर्शन होत राहिले़ वाटेत असंख्य भाविकांनी दर्शन घेत आत्मतृप्ती अनुभवली.

रांगोळ्याच्या पायघड्या
-  पालखी कटारे स्पिनिंग मिल येथून उळे गावच्या दिशेने निघाली़ सायंकाळी ६़३० वाजता उळे गावाच्या वेशीत येताच बँजोच्या निनादात दिंडीचे स्वागत करण्यात आले़ ग्रामस्थांनी वेशीपासूनच रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या़स्वागताला  सरपंच नीता धनके, आप्पा धनके, उपसरपंच बाळू शिंदे सह ग्रामस्थ आले होते़  ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी जेवण देण्यात आले़ या वारकºयांची जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, मारुती मंदिर आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली.

७०० वारकरी
यंदा गजानन महाराज पालखीने ५१ वर्षे पूर्ण केली़ या पालखीसोबत ७०० वारकरी, अश्व आणि वाहने असा लवाजमा आहे़ याशिवाय अतिदक्षता म्हणून अ‍ॅम्ब्युलन्स गाडी, डॉक्टर आणि औषधसाठा सोबत होता़ पांढºया पोशाखातील वारकरी खांद्यावर पताका घेऊन निघाले़ वारकºयांना पाणी पिण्यासाठी टँकरची त्यांनी स्वत: व्यवस्था केली होती़ ३३ दिवसांचा प्रवास करत या दिंडीने रविवारी सायंकाळी सोलापूर हद्दीत प्रवेश केला़ शेगाव-पंढरपूर ७५० किलोमीटरचा प्रवास करीत दिंडी पंढरपुरात विठ्ठलभेटीला दाखल होत आहे़ या पालखीचा चौदस (चतुर्दशी) पर्यंत मुक्काम राहतो़ काला करुन ही दिंडी परतीचा प्रवास करते़ 
शहरात स्वागत 
- दिंडीने रात्री उळे गावाच्या मंदिरात विसावा घेत आध्यात्मिक कार्यक्रम राबविले़ सोमवारी पहाटे ४ वाजता आरती करुन पालखी शहराच्या दिशेने उळ्यातून मार्गस्थ झाली़ सकाळी ९ वाजता रुपाभवानी रोडवरील पाणीगिरणीजवळ महापौरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले़ सोमवारी सायंकाळी ५ वाजता कुचन प्रशाला येथे मुक्काम ठोकणार आहे़ त्यानंतर मंगळवारी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात विसावा घेत आहे़ 

Web Title: Rana of Shegavichi falls in Solapur district, welcome to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.